ऋषभ पंत सध्या न्यूझीलंडमध्ये असून त्याला टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतचे त्याचे नाते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. उर्वशी टी-२० आशिया चषक आणि ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषकादरम्यान दुबईमध्ये टीम इंडियाचा चीअर करताना दिसली होती. दरम्यान, पंतसोबत न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेला आणखी एक युवा क्रिकेटर शुबमन गिल याने दोघांमधील नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना आज होणार आहे. या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

चॅट शो दिल दियां गलांदरम्यान शुबमन गिलला विचारण्यात आले होते, उर्वशी रौतेलाच्या नावाने ऋषभ पंतला खूप चिडवले जाते. संघातील सहकारीही असेच करतात का? यावर गिल म्हणाला की, तिचा ऋषभ पंतशी काहीही संबंध नाही. ती स्वतः काही ना काही करून चर्चेत असते. शुबमन गिलला पुढे विचारण्यात आले की, ऋषभ पंतला या सगळ्याचा फटका बसला आहे का? यावर शुभमन गिल म्हणाला- नाही, त्याला अजिबात पर्वा नाही. कारण पंतला माहीत आहे की असे काही नाही.

मुलाखतीपासून सुरू झाला होता वाद –

उर्वशी रौतेला आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील भांडण एका मुलाखतीवरून सुरू झाल्याची माहिती आहे. उर्वशीने दावा केला होता की, एक व्यक्ती, ज्याला ती मिस्टर आरपी म्हणते, तो तिला भेटण्यासाठी अनेक वेळा फोन करत असे. त्याचे तिच्यावर प्रेम होते. आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतने नंतर या विधानावर जोरदार टीका केली आणि उर्वशीला बहिणा म्हणत असे विधान करू नये असे सांगितले. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात, असा तो म्हणाला होता. यावर उर्वशीने युवा भारतीय क्रिकेटरला छोटू भैया म्हणाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill lifts lid on rishabh pant urvashi rautela episode team india ind vs nz watch video vbm