IND vs NZ Shubman Gill: बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध २०२३ विश्वचषक उपांत्य फेरीदरम्यान भारताचा फलंदाज शुबमन गिल ६५ चेंडूत ७९ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला पायात अचानक क्रॅम्प आला. यामुळे त्याला मैदानातून नाबाद बाहेर पडावे लागले. तत्पूर्वी विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी त्याने ९३ धावांची भागीदारी केली होती. जम बसलेल्या गिलला बाहेर पडावं लागणं हे भारतासाठी चिंतेचं कारण ठरू शकेल असं वाटत असताना श्रेयस अय्यरने गिलच्या जागी येऊन खेळाची गती कायम ठेवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत सामना असल्यास शुबमन गिलला पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची विशेष चर्चा असते. अगदी सचिन तेंडुलकर असो किंवा सचिनची लेक सारा, शुबमनच्या खेळावर अनेकांच्या प्रतिक्रिया फोटो व व्हिडीओ स्वरूपात व्हायरल होतच असतात. पण आज अशा खास व्यक्तींची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे जी पाहून नेटकरी सुद्धा आनंदून गेले आहेत. आजच्या सामन्यात शुबमन गिलचे पालक स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे समजतेय. गिलला क्रॅम्प येऊन तो बाद होण्याआधी त्याचे आई- बाबा लेकासाठी प्रेक्षकांमधून टाळ्या वाजवत होते. तेव्हा विराट कोहलीने गिलच्या हेल्मटवर टॅप करत त्याला शाबासकी देण्याची कृती केली, जे पाहून अनेकांनी कोहली हा टीम इंडियामध्ये प्रत्येकाला किती सांभाळून घेतो असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा<< विराट कोहलीने केन विल्यमसनची विकेट घेतल्याचा Video पाहिला का? कोहली म्हणतो, “तो माझा मित्र, मी पुन्हा कधी..”

प्राप्त माहितीनुसार गिल हा आजच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट म्हणून घोषित करण्यात आला आहे. आयसीसी विश्वचषक २०२३ मधील खेळाच्या अटींनुसार याच सामन्यात गिल आपला डाव पुन्हा सुरू करू शकतो. नियमानुसार, फलंदाजाला त्याच्या डावात कधीही रिटायर्ड म्हणून घोषित केले जाऊ शकते. तत्पूर्वी पंचांना, खेळाला परवानगी देण्यापूर्वी, फलंदाज निवृत्त होण्याचे कारण कळवणे आवश्यक असते. जर एखादा फलंदाज आजारपणामुळे, दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे बाहेर आला, तर तो फलंदाज त्याचा डाव पुन्हा सुरू करू शकतो. जर त्याला पुन्हा डाव सुरु करणे शक्य नसेल तरीही त्याला ‘रिटायर्ड – नाबाद’ म्हणून घोषित केले जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill mom dad in stadium clapping when virat kohli did sweet gesture before gill injured retired out ind vs nz match svs