Shubman Gill break Cheteshwar Pujara records in IND vs NZ 3rd Test : शुबमन गिलने वानखेडे मैदानावर आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. गिलने भारताचा कोलमडणारा डाव शानदारपणे हाताळला आणि शानदार फलंदाजी करताना ९० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यासह त्याने ऋषभ पंतसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, ज्याच्या जोरावर भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. आपल्या खेळीच्या जोरावर गिल कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
शुबमन गिल ९० धावांच्या खेळीमुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने चेतेश्वर पुजाराला मागे टाकले, जो आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. पुजाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३५ सामन्यांमध्ये १७६९ धावा करत भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती, परंतु गिलने आता त्याला मागे टाकले आहे आणि २९ कसोटीच्या ५३ डावांमध्ये १७९९ धावा केल्या आहेत.
रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा –
डब्ल्यूटीसीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कर्णधार रोहितच्या नावावर आहे, ज्याने २६७४ धावा केल्या आहेत. या यादीत विराट २४२६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत १९३३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ३१ धावांवर नाबाद राहिलेल्या शुबमन गिलने दुसऱ्या दिवसाची सुरुवात शानदार केली. शुबमन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने ६६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर १४६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. मात्र, तो कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावण्यापासून १० दूर राहिला.
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे
u
भारताचा पहिला डाव २६३ धावांवर संपला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. यासह टीम इंडियाने २८ धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९० धावा केल्या. शनिवारी भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावांवर खेळ सुरू केला आणि उर्वरित सहा विकेट गमावून १७७ धावा केल्या. शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी आज भारतीय डाव पुढे नेला आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. या काळात पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३वे अर्धशतक तर गिलने सातवे अर्धशतक झळकावले.