भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या वनडे सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात ८५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यानंतर टी-२० सीरिजमध्ये चौथ्या सामन्यात ७७ धावा केल्या होत्या. या अप्रतिम कामगिरीचा गिलला वनडे रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे रँकिंगच्या आकडेवारीनुसार शुबमन गिल चौथ्या नंबरवर पोहोचला आहे. आता गिल आणि कोहलीमध्ये चार क्रमांकांचा फरक असून विराट नवव्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयसीसीच्या फलंदाजांच्या वनडे रँकिंगमध्ये टॉप १० मध्ये फक्त शुबमन गिल आणि विराट कोहली आहे. रोहित शर्मा टॉप १० च्या बाहेर आहे. शुबमनकडे ७४३ पॉईंट्स आहेत. तर पाकिस्तानचा बाबर आझम वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. बाबरच्या नावावर ८८० पॉईंट्स आहेत. तसंच दक्षिण आफ्रिकेचा रासी वेन डेर डुसेन दुसऱ्या नंबरवर आहे. इमाम उल हक तिसऱ्या स्थानी असून त्याच्याकडे ७५२ पॉईंट्स आहेत. आर्यलँडचा हॅरी टेक्टर नंबर ६ वर आहे. त्याच्याकडे ७२६ पॉईंट्स आहेत.

नक्की वाचा – “विराट कोहलीला बळीचा बकरा बनवू नका”, ‘या’ माजी दिग्गज खेळाडूनं रवी शास्त्रींना सुनावलं, म्हणाले, “सचिन तेंडुलकर…”

वनडेत गोलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवचा टॉप १० मध्ये समावेश आहे. सिराज नंबवर ५ वर आहे. त्याच्याकडे ६७० पॉईंट्स आहेत. तर कुलदीप यादव १० व्या स्थानावर आहे. कुलदीपच्या नावावर ६२२ पॉईंट्स आहेत. जोश हेजलवूड अव्वल स्थानावर आहे. त्याच्याकडे ७०५ पॉईंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क दुसऱ्या नंबवर असून त्याच्याकडे ६८६ पॉईंट्स आहेत. तसंच अफगानिस्तानचा मुजीब उर रहमान तिसऱ्या क्रमांकावर आहे.