Shubman Gill Is the Leading Run Scorer 2023: भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुबमनने यावर्षी भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. त्याचवेळी त्याचा हाच शानदार फॉर्म आयपीएलच्या १६व्या हंगामातही पाहायला मिळाला. जिथे गिलने ऑरेंज कॅप पटकावली. गिल या वर्षात टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याने विराटचा विक्रम मोडला आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शुबमन गिलने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५६.१६च्या सरासरीने १०११ धावा केल्या आहेत. वन डेमध्ये ६२४ धावा, टी२० मध्ये २०२ धावा आणि कसोटीत १८५ धावा आहेत. गिलच्या बॅटने या वर्षात आतापर्यंत ५ शतकी खेळी पाहिली आहेत. गिलने या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या होम वनडे मालिकेदरम्यान पहिल्या सामन्यात वनडे फॉरमॅटमधील पहिले द्विशतकही झळकावले.

Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sam Konstas Reveals Chat with Virat Kohli After On Field Collision Between them
Konstas on Virat Kohli: धक्काबुक्की प्रकरणानंतर कॉन्स्टासने घेतली कोहलीची भेट, म्हणाला; “विराट कोहली माझा आदर्श…”
Pat Cummins becomes first bowler toTake record 200 WTC wickets in History IND vs AUS Sydney
IND vs AUS: पॅट कमिन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, WTC च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Virat Kohli Angry After Getting Out and Punches Himself in Frustration After Same Dismissal Video
IND vs AUS: विराट कोहलीचा बाद होताच सुटला संयम, झेलबाद झाल्याचे पाहताच स्वत:वरच संतापला अन्… VIDEO व्हायरल
IND vs AUS Virat Kohli did not hit a single four in his first tine 69 ball innings in Test cricket career in Sydney
IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं
IND vs AUS Virat Kohli was dismissed in the same way in 7 out of 8 innings in the Border Gavaskar Trophy 2024-25
IND vs AUS : विराटने पुन्हा केलं निराश! मालिकेतील ८ पैकी ७ डावात एकाच प्रकारे आऊट, पाहा VIDEO
IND vs AUS Virat Kohli Catch Steve Smith Upset With Umpirs Decision Video Viral IN Sydney Test
Virat Kohli Catch : OUT की NOT OUT? विराट कोहलीला जीवनदान मिळाल्याने स्मिथ अंपायरवर नाराज, पाहा VIDEO

हेही वाचा: Ashes 2023: पॅट कमिन्सनं लढवला किल्ला, रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दोन विकेट्स राखून विजय

या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या २ वर्षांहून अधिक काळ बॅटने झगडणाऱ्या कोहलीला कसोटी फॉरमॅटमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर शतक झळकावण्यात यश आले. कोहलीच्या बॅटने २०२३ मध्ये आतापर्यंत ४९.१८च्या सरासरीने ७८७ धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत एक आणि एकदिवसीय सामन्यात दोन शतकी खेळी केल्या आहे. कोहलीने या वर्षात आतापर्यंत एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

एकदिवसीय विश्वचषकात गिल महत्त्वाची भूमिका बजावू शकतो

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत शुबमन गिलचा फॉर्म भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. जिथे के. एल. राहुल ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत खेळताना दिसतो. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी गिल सांभाळू शकतो. कर्णधार रोहितने या वर्षात आतापर्यंत ४१.९३च्या सरासरीने ६७१ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Shubaman Gill: “कर्णधारपदासाठी रोहितचा पर्याय हा शुबमन…”, BCCIचे माजी निवड समिती प्रमुखांचे मोठे विधान

एकदिवसीय विश्वचषक २०२३ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. भारताने वर्ष १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली. गेल्या १० वर्षांपासून टीम इंडियाला एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पण २०२३चा एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर होत आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियामध्ये असे आठ खेळाडू आहेत, ज्यांचा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभाग निश्चित दिसत आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, के.एल. राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.

Story img Loader