Mohammad Shami Celebration Video Viral: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३३वा सामना गुरुवारी भारत आणि श्रीलंका संघात खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी मोठा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी गुरुवारचा दिवस अतिशय संस्मरणीय ठरला. या खेळाडूने श्रीलंकेविरुद्ध केवळ पाच विकेट घेतल्या नाहीत तर विश्वचषकाच्या इतिहासातील मोठे विक्रमही मोडीत काढले. यानंतर मोहम्मद शमीच्या खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद शमीने घेतल्या ५ विकेट्स –

मोहम्मद शमी आता विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर तो विश्वचषकात सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. शमीनेही आपले यश एका खास पद्धतीने साजरे केले. मोहम्मद शमीने गुरुवारी अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंता, दुष्मंथा चमीरा, कसून रजिता आणि चरित असलंका यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कसून रजिताची विकेट घेतल्यानंतर शमीने ड्रेसिंग रूमच्या दिशेने पाहत चेंडू दाखवला. यानंतर मोहम्मद शमीने डोक्यावर चेंडू ठेवला आणि आपला आनंद खास पद्धतीने साजरा केला. त्यावेळी या सेलिब्रेशनचा अर्थ कोणालाच कळला नाही. मात्र, सामना संपल्यानंतर शुबमन गिलने शमीच्या या खास सेलिब्रेशनचा खुलासा केला.

शुबमन गिलने केला शमीच्या खास सेलिब्रेशनचा खुलासा –

श्रीलंकेविरुद्ध ३०२ धावांनी विजय मिळवल्यानंतर शुबमन गिलने शमीच्या खास सेलिब्रेशनबद्दल खुलासा केला. सामन्यानंतर शुबमन गिलने सांगितले की, ‘मोहम्मद शमीने त्याच्या डोक्यावर चेंडू फिरवून ड्रेसिंग रुममधील गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्याकडे इशारा केला होता. पारस म्हांबरेंच्या डोक्यावर केस नाहीत आणि त्यामुळेच शमी त्याच्या डोक्यावर चेंडू फिरवत होता.’

हेही वाचा – World Cup 2023: टीम इंडियात परतण्यापूर्वी ऋषभ पंतने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, पाहा VIDEO

गोलंदाजी हे रॉकेट सायन्स नाही – मोहम्मद शमी

आपल्या कामगिरीबद्दल बोलताना मोहम्मद शमी म्हणाला, “मी नेहमी खेळपट्टीवर अचूक टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो, मी चेंडूला लयीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या मोठ्या स्पर्धेत एकदा तुमची लय बिघडली, तर परत मिळवणे कठीण होते. अन्यथा, यात रॉकेट सायन्स नाही. आम्ही एकत्र काम करत आहोत आणि तुम्ही त्याचे परिणाम पाहू शकता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill revealed that mohammed shami had turned the ball over his head and signaled to bowling coach paras mhambare vbm
Show comments