Shubman Gill Ruled Out of IND vs AUS 1st Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांची कसोटी मालिका अजून सुरू झालेली नाही आणि टीम इंडियाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलला दुखापत झाल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीपूर्वी रोहित शर्माच्या संघात परतण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे तर आता गिलला दुखापत झाली आहे. त्यामुळे भारताची पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन कशी असणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

पहिल्या कसोटी मालिकेच्या आधी WACA येथे भारताच्या मॅच सिम्युलेशनच्या दुसऱ्या दिवशी स्लिपमध्ये झेल घेताना शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे निश्चित नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध होणार की नाही याबाबत स्पष्टता नाही, त्यामुळे भारतासाठी कोण सलामी देणार आणि गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा – IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल?

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. स्कॅन केल्यानंतर त्याच्या अंगठ्यामध्ये फ्रॅक्टर दिसून आले. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी कमीत कमी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीतून गिल बाहेर झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत बरेच अंतर असल्याने तो दुसऱ्या कसोटीसाठी फिट होऊन संघात परतेल अशी आशा आहे.

गिलच्या दुखापतीनंतर आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अभिमन्यू ईश्वरनला पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि अंगठ्याचे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे, तोपर्यंत गिल पुन्हा संघात सामील होऊ शकतो.

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शुबमन गिल यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात करेल, अशी चर्चा होती. तर रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा १५ नोव्हेंबरला दुसऱ्यांदा बाबा झाला आणि त्यामुळेच तो आणखी काही काळ मुंबईत कुटुंबाबरोबर राहील असे म्हटले जात आहे. आता शुभमन गिल संघाबाहेर झाल्याने अभिमन्यू ईश्वरन कदाचित कसोटी पदार्पण करू शकेल. केएल राहुलसह बॅकअप सलामीवीर म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.

केएल राहुलचा रोहित शर्माच्या जागी सलामीवीर म्हणून विचार केला जाईल, असे गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत म्हटले होते. पण राहुलला देखील इंट्रा स्क्वॉड सामन्यादरम्यान सामन्यादरम्यान दुखापत झाली. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज प्रसीध कृष्णाच्या गोलंदाजीवर त्याला कोपराला दुखापत झाली. दुखापतीनंतर राहुलने सामन्याच्या सिम्युलेशनच्या दुसऱ्या दिवशी मैदानात उतरला नाही. मात्र, त्याला दुखापत झाली नसून संघ व्यवस्थापन केवळ खबरदारी घेत असल्याचे वृत्त आहे.