India vs England Second Test Match Updates : इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावले आहे. शुबमन दुसऱ्या डावात फलंदाजीला आला, तेव्हा तिसऱ्या दिवशी संघाचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल तंबूत परतले होते. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती होती. मात्र शुबमन गिलने संयमाने फलंदाजी करत १३२ चेंडूत शतक झळकावले आणि भारताचा दुसरा डाव सावरला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले.

शुबमन गिलने झळकावले तिसरे कसोटी शतक –

भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा तिसऱ्या दिवशी दोन्ही संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी २८ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. पण जेम्स अँडरसनने प्रथम रोहितला एका शानदार चेंडूने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा यशस्वीही जेम्स अँडरसनचा बळी ठरला. भारताचा दुसरा डाव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलसाठी महत्त्वाचा होता. कारण मागील बऱ्याच डावात तो अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने टीका होत होती. त्याचबरोबर त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली जात होती. मात्र आज त्याने १२ डावांनंतर शतक झळकावत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

अकरा महिन्यानंतर शुबमने झळकावले शतक –

शुबमनने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. यादरम्यान त्याने २३५ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२८ धावांची खेळी केली होता. यानंतर खेळलेल्या १२ डावांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने १२ डावात १३, १८, ६, १०, २९*, २, २६, ३६, १०, २३, ०, ३४ धावा केल्या. हैदराबाद कसोटीत तो शून्यावर बाद झाला, त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले.

Story img Loader