वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आगामी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचे बहुतेक नामांकित खेळाडू सहभाग नोंदवणार असून शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू इश्वरन यांच्याकडे चार संघांच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तारांकित फलंदाजही या स्पर्धेत खेळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजित आगरकर यांच्या निवड समितीने या दोघांसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना या स्पर्धेतून सूट दिली आहे.

Virat Kohli Played under My Captaincy No One Talks About it Said Politician Tejashwi Yadav
Virat Kohli: “विराट कोहली माझ्या नेतृत्वात खेळला आहे…”, बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
sam pitroda statement on rahul gandhi
VIDEO : “राहुल गांधी ‘पप्पू’ नाहीत, तर…”; सॅम पित्रोदांचे विधान चर्चेत!
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Why Jay Shah's tenure as ICC Chief is critical for cricket’s global leap
Jay Shah: ऑलिम्पिक २०२८, कसोटी क्रिकेट अन् बजेट… जय शाह यांच्या ICC अध्यक्षपदाचा कार्यकाळ जागतिक क्रिकेटसाठी का महत्त्वाचा असणार?

दुलीप करंडकातील पहिल्या फेरीचे चारदिवसीय सामने ५ सप्टेंबरपासून बंगळूरु येथे खेळवले जाणार असून देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाची ही सुरुवात ठरेल.

हेही वाचा >>>मोठी बातमी! विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

नऊ मुंबईकरांचा समावेश

श्रेयस, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, मुशीर खान, अष्टपैलू शिवम दुबे, ऑफ-स्पिनर तनुष कोटियन, वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे, मोहित अवस्थी या मुंबईकरांचा चार संघांत समावेश आहे.

पहिल्या फेरीतील सामन्यांसाठी संघ

● ‘ब’ संघ : अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, मुशीर खान, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), एन. जगदीशन (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी.

● ‘अ’ संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, रियान पराग, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कावेरप्पा, शाश्वत रावत.

● ‘ड’ संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टिरक्षक), केएस भरत (यष्टिरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, सौरभ कुमार.

● ‘क’ संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), आर्यन जुयाल, बाब इंद्रजीत, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विजयकुमार वैशाख, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयांक मार्कंडे, संदीप वॉरियर.

(* = ‘ब’ संघातील नितीश कुमार रेड्डीची उपलब्धता तंदुरुस्तीवर आधारित).