सामान्य लोकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच उत्सुकता असते. त्यांच्यासोबतच त्यांचे मुल-मुलीदेखील लोकांच्या चर्चेचा विषय असतात. प्रसिद्ध व्यक्तींची मुलं काय शिकतात? कुठे शिकतात? कुठल्या पार्टीला गेले? कुणाला डेट करत आहेत? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तर शोधण्याचा सर्रास प्रयत्न केला जातो. लोकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या स्टारकिड्सच्या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचाही समावेश होतो. एका इन्स्टाग्राम व्हिडिओवरील कमेंटमुळे सारा सध्या चर्चेत आली आहे. क्रिकेटपटू शुबमन गिलच्या कुटुंबातील एका व्यक्तीने साराच्या व्हिडिओवर ही कमेंट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साराने लाल रंगाच्या गाऊनमधील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे तर तीन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. सारा लाल रंगाच्या गाऊनमध्ये इतकी सुंदर दिसत आहे की, क्रिकेटपटू शुबमन गिलच्या बहिणीनेदेखील यावर कमेंट केली आहे. विशेष म्हणजे शाहनील गिलने डिजीटलपद्धतीने साराची दृष्ट काढली आहे.

शाहनील गिल सारा तेंडुलकरला इन्स्टाग्रामवर फॉलो करते. “तू लाल रंगाच्या ड्रेसमध्ये,” अशी कमेंट शाहनीलने केली आहे. त्यासोबत तिने इव्हिल आय इमोजी आणि एक पांढरा बदामही दिला आहे. शाहनीलच्या कमेंटवर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शाहनीलने साराच्या व्हिडिओवर केलेली कमेंट

काहींनी शाहनीलला सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारले. तर, काहींना असे वाटते की, बहिणीच्या अकाऊंटवरून शुबमननेच ही कमेंट केली आहे. शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्याबाबत वारंवार बातम्या येत आहेत. मात्र, अद्याप दोघांनी याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.