IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात यशस्वी जैस्वालने जबरदस्त झेल टिपत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिलने देखील असाच अफलातून झेल टिपला आहे. तत्पूर्वी इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा ऑल आऊट झाला आहे. चांगल्या सुरूवातीनंतर शेवटपर्यंत ३०४ धावा करत पुन्हा एकदा इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. आता भारताला विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि इंग्लंड यांच्यात कटकमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलने चमकदार कामगिरी केली, त्याने एक नव्हे तर ३ एकापेक्षा एक कमालीचे झेल टिपले. पण त्याचा पहिला झेल अगदी कौतुकास पात्र होता.

इंग्लंडची सलामी जोडी बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी पुन्हा एकदा वेगवान सुरुवात करून अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी अक्षर पटेलने सुरूवातीलाच साधा झेल सोडत सॉल्टला जीवदान दिले. पण नंतर पदार्पणवीर वरुण चक्रवर्तीने त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

इंग्लंडने २ बाद १०२ धावांवर खेळत असताना हॅरी ब्रूक आणि जो रूटने संघाचा डाव उचलून धरला. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी पाहायला मिळाली आणि जी टीम इंडियासाठी घातक ठरत होती. त्यामुळे संघाला लवकरच ही भागीदारी तोडत विकेटची गरज होती. डावाच्या ३०व्या षटकात हॅरी ब्रूकने हर्षित राणाच्या चेंडूवर मोठा फटका खेळत षटकार खेचण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा नीट संपर्क न झाल्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणं शक्य नव्हतं. चेंडू हवेत उडाल्याचे पाहून मिड-ऑफच्या इथून पाठीमागे लांब धाव घेत गिलने एक उत्कृष्ट डाईव्ह मारत झेल टिपला. हॅरी ब्रूकही चकित झाला आणि भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळाली.

गिलच्या या झेलमुळे ब्रूक मोठी खेळी खेळण्यापूर्वीच ३१ धावा करून बाद झाला. यानंतरही टीम इंडियाच्या उपकर्णधाराने उत्कृष्ट झेल घेतला. यावेळी त्याने वेगवान ३४ धावा करणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला पॅव्हेलियनमध्ये धाडले. यावेळी गिलने मिडऑफवर क्षेत्ररक्षण करत असताना डावीकडे डायव्हिंग करून झेल घेतला.तर जडेजाच्या गोलंदाजीवर ४५व्या षटकात त्याने जेमी ओव्हरटनचा झेल टिपत या सामन्यातील तिसरा यशस्वी झेल टिपला.