Ranji Trophy Shubman Gill Video: रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचे बरेच खेळाडू पुन्हा मैदानावर उतरले होते. ज्यामध्ये रणजी सामन्यातील पहिल्याच डावात रोहित शर्मा, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल फेल ठरले होते. पण यानंतर दुसऱ्या डावात खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा चांगला प्रयत्न केला आणि शुबमन गिलने चांगलं कमबॅक करत शतक झळकावले. पंजाबकडून खेळणारा गिल पहिल्या डावात अपयशी ठरला पण दुसऱ्या डावात त्याने एकट्याने लढाऊ खेळी खेळली आणि शानदार शतक झळकावले. पण अखेरीस गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्याने तो संतापला.

कर्नाटक आणि पंजाब यांच्यात बेंगळुरूमध्ये खेळलेला हा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. पंजाबचा संघ पहिल्या डावात अवघ्या ५५ धावांत गारद झाला, त्यात संघाचा कर्णधार शुबमन गिलही केवळ ४ धावा करून बाद झाला. यानंतर कर्नाटकने पहिल्या डावात ४७५ धावा केल्या. पंजाबची कामगिरी दुसऱ्या डावातही सारखीच होती आणि लागोपाठ विकेट पडत राहिल्या. पण कर्णधार शुबमन गिल मात्र पाय घट्ट रोवून उभा होता.

Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत फलंदाजीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या गिलने यावेळी एकटा मैदानात उभा ठाकून कर्नाटकच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याला खालच्या फळीतील फलंदाजांची साथ मिळाली, त्यामुळे गिलने उत्कृष्ट शतक झळकावले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत फलंदाजीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या गिलने यावेळी एकटा मैदानात उभा ठाकून कर्नाटकच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याला खालच्या फळीतील फलंदाजांची साथ मिळाली, त्यामुळे गिलने उत्कृष्ट शतक झळकावले. पण गिलच्या शतकाचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण त्याचे शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच त्याला पायचीत बाद करण्यात आले आणि यामुळे गिल वैतागला. गिलच्या मते चेंडू त्याच्या बॅटला लागला होता आणि असंच काहीस रिप्लेमध्ये दिसत होतं परंतु डीआरएसची सुविधा नसल्याने तो अपील करू शकला नाही.

गिलने अंपायरशी वाद घातला नाही पण जास्त वेळ तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने पूर्ण ताकदीने आपली बॅट हवेत उंच फेकली. क्षेत्ररक्षक सहसा विकेट घेतल्यानंतर जल्लोषात चेंडू हवेत फेकतो त्याचप्रमाणे बॅट गिलने उडवली. गिलने बॅट फेकली पण त्याला दुखापत झाली असती, कारण बॅट त्याच्या अगदी जवळून जमिनीवर पडली. यानंतर, तो बॅट उचलून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि लवकरच पंजाबचा संघ २१३ धावांवर कोसळला आणि एक डाव आणि २०७ धावांच्या फरकाने पराभूत झाला.

Story img Loader