16 Players Debut for Team India in 2023 : भारतीय क्रिकेट संघाच्या बेंच स्ट्रेंथबद्दल नेहमीच चर्चा होत असते. एका वर्षात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची संख्येवरुन टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे याचा अंदाज लावता येतो. २०२३ मध्ये, दोन किंवा चार नव्हे तर एकूण १६ खेळाडूंनी भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी पदार्पण केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाच्या १६ नवीन खेळाडूंनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा एकच खेळाडू आहे. बिहारचा मुकेश कुमार हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने २०२३ मध्ये टी-२०, वनडे आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले आहे. मुकेश कुमार व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूने कोणत्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे, ते जाणून घेऊया.

टी-२० संघात किती खेळाडूंनी पदार्पण केले?

टीम इंडियासाठी २०२३ मध्ये एकूण ११ खेळाडूंनी टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. यामध्ये शुबमन गिल, तिल वर्मा, राहुल त्रिपाठी, शिवम मावी, शाहबाज अहमद, आर साई किशोर, प्रसिध कृष्णा, जितेश शर्मा, मुकेश कुमार, जशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचा – BBL 2023 : स्पेन्सर जॉन्सनचा वेगवान चेंडू लागल्याने ॲलेक्स हेल्स जमिनीवर कोसळला, पाहा VIDEO

वनडे फॉरमॅटमध्ये कोणत्या खेळाडूंनी पदार्पण केले?

२०२३ मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पदार्पण करणार्‍या एकूण खेळाडूंची संख्या पाच आहे. या खेळाडूंमध्ये मुकेश कुमार, रजत पाटीदार, आर साई किशोर, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे.

टेस्ट फॉरमॅटमध्ये कोणी-कोणी पदार्पण केले –

भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी २०२३ मध्ये एकूण ६ खेळाडूंनी पदार्पण केले आहे. यामध्ये केएस भरत, सूर्यकुमार यादव, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णा यांच्या नावांचा समावेश आहे. सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रसिध कृष्णाने पदार्पण केले. अशाप्रकारे २०२३ हे वर्ष भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी अविस्मरणीय ठरले आहे. यावर्षी टीम इंडियाच्या एकूण १६ नवीन खेळाडूंनी क्रिकेटच्या कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे.

हेही वाचा – AUS vs SA Test Series : नॅथन लायनने मोडला हरभजन आणि बेदीचा मोठा विक्रम, पाकिस्तानविरुद्ध केला खास पराक्रम

आता या १६ खेळाडूंपैकी किती खेळाडू आपले संघातील स्थान कायम ठेवण्यात यशस्वी होतात, हे महत्त्वाचे असणार आहे. या सर्व खेळाडूंमध्ये टीम इंडियाचे भविष्य सांभाळण्याची क्षमता आहे, मात्र या सर्व खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी पाहता शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार हे काही खेळाडू आहेत, जे पुढील अनेक वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळू शकतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill tilak verma mukesh kumar yashsvi jaiswal cricketers made their debut in team india in 2023 vbm