Shubman Gill beats Virat in Yo-Yo Test: विराट कोहली त्याच्या शानदार फलंदाजीशिवाय त्याच्या उत्कृष्ट फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की अलीकडच्या काळात शुबमन गिलने यो-यो टेस्टमध्ये विराट कोहलीपेक्षा स्कोअर केला आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलने यो-यो कसोटीत सर्वाधिक स्कोअर केला आहे. शुबमन गिलने सर्वाधिक १८.७ गुण मिळवले. शुबमन गिलपेक्षा जास्त स्कोअर कोणीच केला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० ऑगस्टपासून सुरू होणार्‍या आशिया चषकापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंच्या नियमित फिटनेस चाचण्या घेतल्या जात आहेत. युवा शुभमन गिलने १८.७ गुणांसह ‘यो-यो’ चाचणीत अव्वल स्थान पटकावले आहे आणि १६.५ ची ‘कट-ऑफ’ पातळी ओलांडली आहे. विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम शेअर केलेल्या स्टोरीनुसार १७.२ स्कोअर केला.

शुबमन गिलने यो-यो टेस्टमध्ये विराट कोहलीला टाकले मागे –

वास्तविक, असे मानले जाते की जे खेळाडू सर्वात तंदुरुस्त असतात, ते यो-यो चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळवतात. यो-यो चाचणी हे खेळाडूंच्या फिटनेसचे मोजमाप करण्याचे प्रमाण आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने अनेकदा यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोअर केला होता, मात्र यावेळी शुबमन गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, नुकताच भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात शुबमन गिल मैदानावर दिसला होता. यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडला गेला. शुबमन गिल या संघाचा भाग नव्हता.

हेही वाचा – Asia Cup 2023: बीसीसीआयने पीसीबीचे स्वीकारले आमंत्रण, राजीव शुक्ला रॉजर बिन्नीसोबत पाकिस्तानला होणार रवाना

जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि केएल राहुल वगळता या पाचही क्रिकेटपटूंनी ही चाचणी केली आहे. यो-यो चाचणी ही एक ‘एरोबिक एन्ड्युरन्स फिटनेस टेस्ट’ आहे, ज्याचे निकाल तुम्ही शेवटचे कधी खेळलात आणि गेल्या आठवड्यात तुम्ही किती वर्कलोडमधून गेलात यावर अवलंबून बदलू शकतात, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

ते म्हणाले, “गिलचा सर्वोच्च स्कोअर १८.७ होता. बहुतेक खेळाडूंनी १६.५ ते १८ दरम्यान स्कोअर केला. बीसीसीआयने हे फिटनेस-कम-कंडिशनिंग शिबिर आयोजित केले आहे. कारण ऑक्टोबरमध्ये विश्वचषकापूर्वी ही एकमेव विंडो होती.” सूत्राने पुढे सांगितले की, “जर खेळाडूंना दोन स्पर्धांमध्ये वेळ असेल, तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा क्रीडा विज्ञान संघ, भारतीय संघाच्या क्रीडा कर्मचार्‍यांसह, सर्व अनिवार्य चाचण्या घेतात.”

हेही वाचा – World Cup 2023: भारताच्या माजी कोचने विश्वचषकासाठी निवडला संघ, आशिया चषकमधील ‘या’ खेळाडूंना वगळले

संघ व्यवस्थापन विराट कोहलीवर नाराज –

दरम्यान, इन्स्टाग्राम स्टोरीवर यो-यो टेस्टचा स्कोअर पोस्ट केल्याबद्दल विराट कोहलीला बीसीसीआयने इशारा दिला आहे. कोहलीच्या या कृत्यामुळे बोर्ड संतप्त झाले असून त्यांनी सर्व क्रिकेटपटूंना कडक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. खेळाडूंना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, यो-यो चाचणीचे गुण गोपनीय माहितीमध्ये येतात आणि कोणत्याही परिस्थितीत ते उघड करू नयेत. बोर्डाने खेळाडूंना त्यांची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास मनाई केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill tops and virat kohli left behind in yo yo test vbm