Shubman Gill and Abhishek Nair bet video : भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. पर्थमधील हा सामना टीम इंडियाने जिंकला होता. शुबमनच्या जागी देवदत्त पडिक्कल संधी मिळाली होती, पण तो संधीचं सोनं करण्यात अयशस्वी ठरला. शुबमन आता तंदुरुस्त झाला असून तो ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळू शकतो. याआधी त्याने संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी एक पैज लावली होती, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शुबमन गिल आणि अभिषेक नायरसोबत क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची अटकळ बांधली जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी गिलला दुखापत झाली होती, त्यामुळे संघाची चिंता वाढली होती. त्याच्या अनुपस्थितीतही टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता.

कशाची लागली होती पैज?

ॲडलेडमधील सामन्यापूर्वी टीम इंडियाने कॅनबेरामध्ये पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळला. पहिल्या दिवसाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान, शुबमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यात चुरशीची लढत झाली. दोघांनी ५० यूएस डॉलर्स म्हणजेच सुमारे ४२०० रुपयांची पैजही लावली. वास्तविक, दोघांनी केकेआरसाठी एकत्र काम केले आहे. त्यावेळी गिल संघाचा सलामीवीर आणि नायर फलंदाजी प्रशिक्षक होते. दोघेही एकमेकांशी कोणत्या ना कोण तरी पैज लावायचे.

हेही वाचा – Marco Jansen : मार्को यान्सनने ११ विकेट्स घेत घडवला इतिहास, भारतीय दिग्गजाचा मोडला २८ वर्ष जुना विक्रम

कोणी जिंकली पैज?

k

यावेळी कॅनबेरामध्ये दोघांनी चेंडूने सिंगल स्टंप उडवण्याची पैज लावली होती. बीसीसीआयने या पैजेचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी दोघांसमोर सिंगल स्टंप उडवण्याचे चॅलेंज ठेवले होते. मात्र, स्टंपला उडवण्यापूर्वी अभिषेक नायर म्हणाला की, गिलला स्टंप उडवता येणार नाही आणि जर त्याने उडवली तर ४२०० रुपये देईन. यानंतर टी दिलीपने या दोघांना सिंगल स्टंप उडवण्यासाठी तीन चान्स होते. ज्यामध्ये नायर आणि गिल प्रत्येकी एकदा स्टंप उडवण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे, टी दिलीपने यांनी एका चान्समध्येच स्टंप उडवली आणि आपण टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक का आहे, हे दाखवून दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill vs abhishek nayar bcci shares video of single stump blowing bet before ind vs aus adelaide test vbm