जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केल्यापासून ट्वीटरवर लोक अधिकच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. इलॉन मस्कने स्वतः अनेक ट्विट करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. ट्विटरवर लोकांनी इलॉन मस्क यांना इतर कंपन्या देखील खरेदी करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. या यादीत भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिलचेही नाव जोडले गेले आहे.
शुबमन गिलने रात्री ११ वाजून १ मिनिटांनी ट्विट केले आहे. ज्यात त्याने इलॉन मस्क यांना टॅगही केले आहे. गिल यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, “इलॉन मस्क, कृपया स्विगी खरेदी करा जेणेकरून ते वेळेवर वितरित करू शकतील.
इलॉन मस्क यांनी शुभमन गिलचे हे ट्विट वाचले असेल की नाही, माहिती नाही पण स्विगीने मात्र गिलच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिलं आहे.
“हाय शुबमन, ट्विटर किंवा ट्वीटर नाही, आम्हाला फक्त तुमच्या ऑर्डरनुसार(तुम्ही ऑर्डर दिल्यास) सर्वकाही परिपूर्ण असावे असे वाटते. तुमच्या तशीलासह थेट मेलेद्वारे आमच्याशी संपर्क साधा, आम्ही जलद कार्यवाही करू.”
तसचे, यानंतर स्विगीकडून आणखी एक ट्वीट करण्यात आलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, आम्हाला शुबमनचा मेसेज मिळाल आहे, जलदगतीने काम होईल.
दरम्यान, शुबमनने केलेल्या ट्वीटची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. शिवाय, त्याच्या ट्वीटवरच अनेकांचे ट्वीट देखील आले आहेत. काहींनी त्याच्या सध्याच्या आयपीलएल मधील खेळावर देखील भाष्य केलेलं आहे.
याचबरोबर एका बनावट स्विगी अकाउंट वरू गिलच्या ट्विटला रिट्वीट करण्यात आलं असून, यामध्ये शुभमनवरच टीका करण्यात आल आहे. ‘आमची सेवा तुझ्या टी-20 क्रिकेटमधील फलंदाजीपेक्षा जलद आहे.’ असा टोला या ट्वीटद्वारे लगावला गेला आहे.