इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीव शुक्ला यांनी राजीनामा दिला होता. परंतु शुक्रवारी होणाऱ्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीचे ते अध्यक्षस्थान भूषविणार अशी चिन्हे आहेत.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचे रणकंदन माजले असताना शुक्ला यांनी आयपीएल अध्यक्षपदाचा त्याग केला होता. परंतु बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी शुक्ला यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.‘‘मला शुक्रवारी होणाऱ्या आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्षस्थान भूषवायला सांगितले, तर मला कोणतीही हरकत नसेल. परंतु मला दिर्घ काळासाठी ते कायम राखायचे आहे का, हा प्रश्न आहे,’’ असे शुक्ला यावेळी म्हणाले.