CWG 2022 : बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारातील पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतने कांस्यपदक पटकावले आहे. त्याने सिंगापूरच्या जिया हेंग तेहचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला.

हेही वाचा – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा :  तिहेरी उडीत पॉलला सुवर्ण ; अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताची पदकलूट; अबुबाकेरला रौप्य

पहिल्या फेरीत सिंगापूरच्या जिया हेंग तेहने श्रीकांतला कडवे आव्हान दिले होते. मात्र, श्रीकांतने उत्तम खेळ खेळत जिया हेंग तेहचा २१-१५ ने पराभव केला. तर दुसऱ्या फेरीतही जिया हेंग तेहचा २१-१८ ने पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले.

दरम्यान, आज ११ व्या दिवशी ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू हीचा सामाना जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या मिशेल लीशी होणार आहे. तर पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या त्झे योंग एनजीशी होईल. तसेच पुरुष दुहेरी फेरीतही सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीही अंतिम सामना खेळणार आहे.

Story img Loader