Sikandar Raza Break Virat Kohli and SuryaKumar Yadav Record : बुधवारी झिम्बाब्वे विरुद्ध गांबिआ टी-२० सामना इतिहासाच्या पानांमध्ये नोंदला गेला आहे. झिम्बाब्वेने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक उपप्रादेशिक आफ्रिका पात्रता सामन्यात गांबियाचा पराभव केला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३४४ धावा केल्या होत्या, तर गांबिआ संघाला ५४ धावांवर गुंडाळत २९० धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात कर्णधार कर्णधार सिकंदर रझाने ऐतिहासिक शतक झळकावले. त्याने अवघ्या ३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यादरम्यान त्याने विराटआणि कोहलीचा विश्वविक्रम मोडला.

सिकंदर रझाने विराट-सूर्याचा विश्वविक्रम मोडला –

सिकंदरने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडला आहे. सिकंदर हा पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला आहे. आता त्याच्या खात्यात १७ सामनावीर पुरस्कार आहेत. विराटने १६ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत. त्याने टी-२० विश्वचषक २०२४ नंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खात्यातही १६ पुरस्कार आहेत. सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. त्याने संयुक्तपणे दुसरे जलद शतक झळकावले आहे.

या सामन्यात अद्भुत अशा फटकेबाजीचं प्रदर्शन करत झिम्बाब्वेने गांबिआविरुध्दच्या टी२० लढतीत ३४४ धावांचा पर्वतच उभारला. टी-२० प्रकारात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० विश्वचषकाच्या उपप्रादेशिक आफ्रिका पात्रता सामन्यात झिम्बाब्वेने हा पराक्रम केला. सिकंदर रझाने अवघ्या ३३ चेंडूत शतक साजरं केलं. त्याने १५ षटकारांसह नाबाद १३३ धावांची खेळी केली. सिकंदरच्या १५ सह बाकी फलंदाजांनी मिळून आणखी १२ षटकार चोपले. हाही एक विश्वविक्रम आहे.

हेही वाचा – IND vs NZ : ‘तो तर अजून…’, शोएब अख्तरने विराटच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारताच वीरेंद्र सेहवागने दिले चोख प्रत्युत्तर

झिम्बाब्वेने रचली टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या –

या प्रचंड मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गांबिआचा डाव ५४ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २९० धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. नैरोबीतल्या रुराका स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर झालेल्या लढतीत झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी चौकार, षटकारांची लयलूट केली. तब्बल ५७ चौकार पाहायला मिळाले. ब्रायन बेनेटने २६ चेंडूत ५०, तादूवानाशे मारामनीने १९ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. क्लाईव्ह मदांदेने १७ चेंडूत ५३ धावा फटकावल्या. रायन बर्लने ११ चेंडूत २५ धावा केल्या. गांबिआच्या मुसा जोबारटेहच्या ४ षटकात झिम्बाब्वेने ९३ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना गांबिआचा डाव ५४ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेतर्फे रिचर्ड नकाराग्वा आणि ब्रॅंडन मावुटा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.