Sikandar Raza breaks 19 years old record: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरम्यान, दोन नवे संघ विश्वचषक खेळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या क्वालिफायर सामने खेळवले जात आहेत. आता सुपर ६ मध्ये पोहोचलेल्या संघांमधील सामने सुरू झाले आहेत. दरम्यान, ओमानविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने आणखी एक अप्रतिम खेळी केली. त्याने आपल्याच देशाच्या १९ वर्षांहून अधिक जुन्या माजी खेळाडूचा विक्रम मोडीत काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिकंदर रझाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण केल्या –

सुपर ६ मध्ये सिकंदर रझाने ओमानविरुद्ध ४९ चेंडूत ४२ धावा केल्या. तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही, परंतु त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ४००० धावा नक्कीच पूर्ण केल्या. हा आकडा गाठण्यासाठी त्याला १२७ डाव खेळावे लागले, जे झिम्बाब्वेकडून इतक्या धावा करण्यासाठी सर्वात कमी आहेत.

यापूर्वी ग्रँड फ्लॉवरने १२८ डावांत ४००० धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने २००४ साली सहा हजार धावा केल्यानंतर निवृत्ती घेतली, म्हणजेच त्यापूर्वी त्याने चार हजार धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. आता सिकंदर रझा त्यांच्याही पुढे गेला आहे. दुसरीकडे, यानंतर ब्रेंडन टेलरने १२९ डावांतच चार हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. अँडी फ्लॉवरने १३३ डावांत तर शॉन विल्यम्सने १३५ डावांत ४००० धावा पूर्ण केल्या.

हेही वाचा – Rishabh Pant: विश्वचषकापूर्वी ऋषभ पंतने अचानक का बदलली जन्मतारीख? जाणून घ्या कारण

सिकंदर रझाची आयसीसी क्रमवारीतही कमाल –

सिकंदर रझाने गेल्या काही सामन्यांमध्ये प्रभावी फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. यामुळेच त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत उल्लेखनीय झेप घेतली आहे. सध्या संघ किमान दोन सामने खेळेल. त्याचबरोबर सुपर ६ मध्ये जर चांगली कामगिरी केली, तर आणखी सामने मिळू शकतील. त्यानंतर संघ विश्वचषकातील मुख्य सामने खेळताना दिसेल.

सिकंदर रझा याआधी पंजाब किंग्जकडून आयपीएल खेळताना त्याने दोनदा सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. येत्या सामन्यांमध्ये झिम्बाब्वे आणि खुद्द सिकंदर रझा यांची कामगिरी कशी होते हे पाहणे बाकी आहे. दरम्यान, सिकंदर रझा पुढे इतर संघांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.