बर्मिघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी प्रकारात त्याने ही कामगिरी केली. हे पदक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व शूर भारतीयांना समर्पित करतो आहे, अशी प्रतिक्रिया संकेतने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संकेतने पहिल्या फेरीत स्नॅच या प्रकारात ११३ किलोग्राम वजन उचलले. तर दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्कमध्ये १३५ किलोग्राम वजन उचलत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. मात्र, दुसऱ्या फेरीदरम्यान संकेत जखमी झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

रौप्यपदक जिंकल्यानंतर संकेतने प्रतिक्रिया दिली. हे पदक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व शूर भारतीयांना समर्पित करत असल्याचे त्याने म्हटले. तर माझ्या मुलाने भारताला पहिले पदक मिळवून दिल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. माझे एक चहा आणि पानाचे दुकान आहे. माझ्या मुलीने पंचकुला, हरियाणात सुवर्णपदक जिंकले आहे आणि माझ्या मुलाने लंडनमध्ये रौप्य पदक जिंकले आहे, त्यामुळे मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया संकेतच्या वडिलांनी दिली.

२१ वर्षीय संकेतच्या नावावर सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत २५६ किलोग्रॅम वजन उचलण्याचा विक्रम आहे. तसेच राष्ट्रीय स्थरावरही त्यांने अनेकदा पदकं मिळवली आहेत.

पंतप्रधान मोदींकडून संकेतचे अभिनंदन

रौप्य पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकेताचे अभिनंदन केले आहे. “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संकेतचे रौप्य पदक ही भारतासाठी चांगली सुरुवात आहे. त्याचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा,” असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.