वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू फिल सिमॉन्स यांनी आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डिसेंबर २०१७ मध्ये सिमॉन्स यांची अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. ‘‘अफगाणिस्तानला २०१९च्या विश्वचषकासाठी पात्र ठरवण्याच्या हेतूने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संघबांधणीत यशस्वी झाल्याने मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाला (एसीबी) मी कागदपत्रे सोपवली असून, मला माझा करार वाढवण्याची इच्छा नाही. १५ जुलै रोजी माझा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी काही तरी नवे करणार आहे,’’ असे सिमॉन्स यांनी सांगितले.

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व गुलाबदीन नैबकडे देण्यात आले आहे. चार वर्षांपासून कर्णधाराची भूमिका निभावणाऱ्या असगर अफगाणची अचानक हकालपट्टी करून नैबकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याच्या निर्णयाविषयी तुम्हाला कल्पना होती का, असे विचारले असता सिमॉन्स म्हणाले, ‘‘खरे सांगायचे तर मला या निर्णयाविषयी पुसटशीही कल्पना नव्हती. एसीबी आणि निवड समितीने सर्वस्वी हा निर्णय घेतला असून मला त्यामागील कारणही स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्रशिक्षक म्हणून मला फक्त उपलब्ध खेळाडूंच्या साहाय्याने सर्वोत्तम संघ घडवण्याचे कार्य सोपवले होते. मात्र कर्णधाराच्या बदलीमुळे संघाच्या मानसिकतेत फारसा बदल जाणवणार नाही, याची मी काळजी घेतली.’’