एनएससीआय कोर्टावर झालेल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या अमृतमहोत्सवी बॅडमिंटन स्पर्धेत सिमरन सिंघीने मुलींच्या १३ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुटाचा मान संपादन केला. सिमरनने १५ वर्षांखालील गटात राधिका गणपतीला २१-१०, २१-१५ असे पराभूत करत विजेतेपद पटकावले, तर १३ वर्षांखालील गटात जान्हवी जगतापवर २१-११, २१-१३ असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. मुलींच्या अन्य गटांमध्ये १० वर्षांखालील गटात ऋि षा दुबेने दिया पटेलचा २१-७, २१-५ असा फडशा पाडत अजिंक्यपद पटकावले, तर मुलींच्या १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत श्रुती सिन्हाने नमिता शेट्टीला अटीतटीच्या लढतीत २१-१६, २३-२१ असे पराभूत करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुलांमध्ये १७ वर्षांखालील गटात साई दिनेश रेड्डीने जेतेपदाला गवसणी घातली, तर १५ वर्षांखालील गटात अक्षन शेट्टी विजेता ठरला. मुलांच्या १० वर्षांखालील गटात दर्शन पुजारी आणि १३ वर्षांखालील गटात वरुण दवे यांनी अजिंक्यपद पटकावले.

Story img Loader