रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ७ गडी राखून मात केली. या सामन्यात ५० धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. या खेळीदरम्यान रोहितने आणखी एका यादीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. १ जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० च्या वर षटकार ठोकले आहेत.

अवश्य वाचा – IND vs NZ : महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत रोहित शर्मा षटकारांचा बादशहा

या यादीमध्ये मार्टीन गप्टील, कॉलिन मुनरो, विराट कोहली यासारखे सर्व फलंदाज हे विराटच्या मागे आहेत. न्यूझीलंडच्या भूमीतला भारताचा हा पहिला टी-२० विजय ठरला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी होणार आहे, त्यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ टी-२० मालिकेतही विजय मिळवण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे उपलब्ध असणार आहे.

Story img Loader