चीनमधील गुआंगझाऊ येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या विश्व अिजक्य बॅडमिंटन स्पध्रेत कांस्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या पी. व्ही. सिंधूला भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने १५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. आपल्या बॅडमिंटन कारकीर्दीतील पहिल्याच विश्व अजिंक्यपद स्पध्रेत खेळणाऱ्या सिंधूने पदक जिंकून इतिहास घडविला आहे. ती हा पराक्रम करणारी पहिला महिला तर तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
क्रीडामंत्र्यांकडून अभिनंदन
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले. जितेंद्र यांनी आपल्या अभिनंदन पत्रात म्हटले आहे की, ‘‘विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत स्पृहणीय कामगिरी बजावल्याबद्दल तुझे अभिनंदन. महिला एकेरीत कांस्यपदक जिंकून तू देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहेस.’’