युवा पी.व्ही. सिंधू आणि अजय जयरामला यांना मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. हे दोघेही पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूला जपानच्या ओखुहारा नोझोमीने २१-१९, १३-२१, २१-१८ असे नमवले. कोरियाच्या ह्य़ुयेक जिन जिऑनने अजय जयरामवर १०-२१, २१-१७, २१-१६ अशी मात केली. पहिला गेम जिंकत अजयने आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर जिऑनच्या झंझावाती खेळासमोर अजय निष्प्रभ ठरला.

Story img Loader