भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. २०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्यायादीत सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळालं आहे. या यादीमध्ये सिंधू सातव्या स्थानावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाहीरातींच्या माध्यमातून सिंधूने यंदाच्या वर्षात अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत. महत्वाची गोष्ट मध्ये पहिल्या १० जणांमध्ये सिंधू ही एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने या यादीमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. सेरेनाने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून १८.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. काल फोर्ब्सने ही यादी जाहीर केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhu only indian in top paid female athletes list of forbes with 60 cr rupees