पी.व्ही. सिंधू आणि एच.एस. प्रणॉय यांनी मकाऊ बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. मात्र अजय जयरामला पराभवाला सामोरे जावे लागले. पाचव्या मानांकित सिंधूने कोरियाच्या किम ह्य़ो मिनवर २१-१३, २२-२० असा विजय मिळवला. पुरुषांमध्ये सातव्या मानांकित प्रणॉयने तैपेईच्या लिन चिआ ह्युसानवर २१-१९, २१-१५ अशी मात केली. बी.साईप्रणीतने उझबेकिस्तानच्या आटय़रेम सॅव्हटय़ुगिनला २१-११, २१-८ असे नमवले. चीनच्या लिन गिपूने अजयवर २१-११, २१-१७ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत जपानच्या युकी फुकूशिमा आणि सायाका हिरोता जोडीने ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा २१-१६, २१-१५ असा पराभव केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा