मकाऊ स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्कि नोंदवणाऱ्या पी.व्ही.सिंधूसह किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांनी इंडोनेशिया ग्रां.प्रि. बॅडिमटन स्पध्रेत विजयी सलामी दिली. अव्वल मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिआ मरिस्कावर २१-१६, १९-२१, २१-१२ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सिंधूचा मुकाबला इंडोनेशियाच्याच वुलान कहाया उतमी सुकोपुत्रीशी होणार आहे.
पुरुष गटात अव्वल मानांकित श्रीकांतने इंडोनेशियाच्या विबोवो सेत्यलादी पुत्रावर २१-६, २१-१२ अशी मात केली. श्रीकांतची पुढची लढत इंडोनेशियाच्या सापुत्रा व्हिकी अंगाशी होणार आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्तने इंडोनेशियाच्या मुहम्मद अहिदाल ओक्टा खैरुल्लाला २१-१०, २१-३ असे नमवले. एच. एस. प्रणॉयने इंडोनेशियाच्या पन्जी अहमद मौलानाचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला.

Story img Loader