भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एका मराठी चित्रपटात गाणे गात आपल्याला ही शैलीही जमते याचा प्रत्यय घडविला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत आता सचिन तेंडुलकरही एक गीत म्हणणार आहे. महिलांचे हक्क रक्षणासाठी सुरू केल्या जाणाऱ्या अभियानात तो हे गीत सादर करणार आहे.
मार्ड संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या अभियानात ख्यातनाम दिग्दर्शक व अभिनेता फराह अख्तर सहभागी होणार आहे. महिलांवरील अत्याचार व पक्षपातीपणाविरुद्ध हे अभियान आयोजित केले जाणार आहे. त्यामध्ये सचिन हा मराठी गीत गाणार आहे. सचिनच्या सहभागामुळे हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल अशी मार्डची अपेक्षा आहे. हे गीत जावेद अख्तर यांनी हिंदूीत लिहिले असून या गीताचे तेलगु, तामिळ, पंजाबी व मराठी आदी भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले  आहे. जितेंद्र जोशी यांनी मराठी भाषेत भाषांतर केले आहे.