महाराष्ट्राच्या उपकनिष्ठ संघातील सहा फुटबॉलपटूंना डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांनी रविवारी दमण आणि दीव संघाविरुद्ध होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील सामन्यातून माघार घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहापैकी दोघांना डेंग्यू तर एकाला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले असून अन्य चार जणांच्या रक्तातील पेशींची संख्या कमी झाली आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे (एआयएफएफ) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र संघातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘संघातील आठ मुलांना विविध चाचण्यांसाठी विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी सहा मुले हॉटेलमध्ये परतली आहेत. मात्र त्यापैकी चार जण रक्तातील पेशींची संख्या कमी झाल्यामुळे रविवारच्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. त्यांच्या डेंग्यूच्या अहवालाची आम्हाला प्रतीक्षा आहे.’’

‘‘संघातील काही मुले दमण आणि दीवविरुद्ध खेळू शकणार नसली तरी उपलब्ध खेळाडूंसह आम्हाला या सामन्यात उतरावे लागेल,’’ असेही त्यांनी सांगितले.