अमेरिका व नॉर्वे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकून हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकांचा श्रीगणेशा केला. पुरुषांच्या स्लोपस्टाईल शर्यतीत अमेरिकेच्या सॅजी कोस्टेनबर्ग याने सुवर्णपदक जिंकले तर नॉर्वेच्या स्टॅली सँडबेच याला रौप्यपदक मिळाले. चुरशीने झालेल्या या शर्यतीत कॅनडाच्या मार्क मॅकमॉरीसने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या १५ किमी स्कीथॉन शर्यतीत नॉर्वेची मॅराट बोर्गेन सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिची सहकारी हैदी वेंग हिला कांस्यपदक मिळाले. उत्कंठापूर्ण शर्यतीत स्वीडनच्या चालरेटी कॅला हिला रौप्यपदक मिळाले.
बर्फावरील हॉकीच्या महिला गटात अमेरिकेने विजयी प्रारंभ केला. त्यांनी फिनलंडला ३-१ असे पराभूत केले. त्या वेळी त्यांच्याकडून हिलरी नाइट, कॅली स्टेक व अॅलेक्स कार्पेन्टर यांनी प्रत्येकी एक गोल केला. फिनलंडचा एकमेव गोल सुसाना तोपौनी हिने नोंदविला.
फिश्त स्टेडियमवरील उद्घाटन सोहळ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: समलिंगी खेळाडूंच्या स्पर्धेवर बंदी घालण्याच्या रशियाच्या निर्णयावरून हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी देशात अनेक ठिकाणी निदर्शने झाली होती. या पाश्र्वभूमीवर उद्घाटन सोहळा व्यवस्थित पार पडणार की नाही, याचे औत्सुक्य होते. लेझर शो व फटाक्यांच्या आतषबाजीसह झालेल्या दिमाखदार सोहळ्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
क्रीडाज्योत दौडीत टेनिसपटू मारिया शारापोव्हा, ऑलिम्पिक रिदमिक जिम्नॅस्ट एलिना काबायेवा, फिगरस्केटिंगपटू इरिना रोडनिना यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू सहभागी झाले होते.
अमेरिका व नॉर्वेला प्रत्येकी एक सुवर्ण
अमेरिका व नॉर्वे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकून हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकांचा श्रीगणेशा केला. पुरुषांच्या स्लोपस्टाईल शर्यतीत अमेरिकेच्या सॅजी कोस्टेनबर्ग याने सुवर्णपदक जिंकले तर नॉर्वेच्या स्टॅली सँडबेच याला रौप्यपदक मिळाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-02-2014 at 12:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ski star miller blasts danger course us take first gold