Skipper Cheteshwar Pujara has been banned for one match: क्रिकेटमध्ये कर्णधार असल्याने अनेकदा गंभीर नुकसान होते. टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजाला कर्णधारपदाची शिक्षा झाली आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा सध्या देशी क्रिकेट खेळत आहे आणि ससेक्सचे कर्णधार आहे. पण सहकाऱ्यांच्या कृतीमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. पुजाराची गणना टीम इंडियाच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते.
मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संघातून वगळण्यात आले होते. पुजारा बऱ्याच काळापासून कौंटी क्रिकेट खेळत आहे आणि काही काळ ससेक्सचा कर्णधार आहे. खेळाडूंच्या वाईट वागणुकीमुळे ससेक्सवर १२ गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे कर्णधार पुजारावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.
खेळाडूंनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारावा यासाठी ईसीबीने कठोर नियम केले आहेत. या मोसमात ससेक्सवर चार वेळा फिक्स्ड पेनल्टी (निश्चित दंड) आकरण्यात आली असून त्यामुळे ससेक्सच्या कर्णधाराला बंदीला सामोरे जावे लागले आहे. ईसीबीने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, १३ सप्टेंबर रोजी लेस्टर विरुद्ध दोन अतिरिक्त फिक्स्ड पेनल्टीमुळे ससेक्सला ही शिक्षा देण्यात आली आहे. ईसीबीने सांगितले की या सामन्यापूर्वी त्यांच्या खात्यात आधीच दोन फिक्स्ड पेनल्टी होत्या.
हेही वाचा – IND vs AUS: ‘…म्हणून विराट-रोहितला पहिल्या दोन सामन्यातून वगळले’; मुख्य निवडकर्ता अजित आगरकरचा खुलासा
या खेळाडूंच्या चुकीमुळे कर्णधार पुजारावर एका सामन्याची बंदी –
ईसीबीने ससेक्सवर केलेली कारवाई काउंटीने मान्य केली आहे. ससेक्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल फॅब्रास यांनी संघाचे खेळाडू टॉम हेन्स आणि जॅक कार्सन यांना वाईट वर्तनामुळे पुढील सामन्यातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लीसेस्टरशायरविरुद्ध जे काही घडले, त्यानंतर एरी कार्वेलास तपास पूर्ण होईपर्यंत बाहेर ठेवले जाईल. ससेक्सने लीसेस्टरशायरवर १५ धावांनी विजय मिळवला होता. मात्र या सामन्यात संघाच्या या तिन्ही खेळाडूंचे वर्तन चांगले नसल्यामुळे संघाला पेनल्टी मिळाली. त्यामुळे कर्णधार पुजारावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा – IND vs AUS: सहा वर्षांत दोन वनडे खेळणारा अश्विन २१ महिन्यांनंतर परतला, काय आहे रोहित-आगरकरचा प्लॅन?
काय आहे नेमके प्रकरण –
२२ वर्षीय ऑफस्पिनर कार्सनने लीसेस्टरशायरच्या बेन कॉक्सला नॉन स्ट्रायकरच्या एंडला आऊट करण्याचा प्रयत्न केला. त्याने ससेक्स वेबसाइटवर केलेल्या कृतीबद्दल माफीही मागितली आहे. शेवटच्या दिवशी ओपनस हेन्सशी वाद झाला होता. त्याबद्दल त्याने माफीही मागितली आहे. यानंतर मैदानावरील पंचांनी दोन्ही खेळाडूंवर लेव्हल वन आणि लेव्हल टूच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. प्रशिक्षक म्हणाले, की संघाने अशा प्रकरणांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, जे त्यांनी केले आहे आणि ते असे वर्तन खपवून घेणार नाही.