SL beat NZ By 63 Runs in 1st Test: न्यूझीलंडचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, तिथे दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने मोठा अपसेट निर्माण करत न्यूझीलंडचा ६३ धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा विजय आणि न्यूझीलंडच्या पराभवानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेचे समीकरणही बदलताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या कसोटी मालिकेच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेने न्यूझीलंडचा ६३ धावांनी पराभव केला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने ८ बाद २०७ धावा केल्या होत्या. विजयासाठी किवी संघाला ६८ धावांची गरज होती. रचिन रवींद्र ९१ आणि एजाज पटेल खाते न उघडता खेळत होता. पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा संघ २९ चेंडूंत दोन विकेट गमावत सर्वबाद झाला. प्रभात जयसूर्याने रचिन रवींद्र आणि विल्यम ओ’रुर्के यांना बाद करत पाच विकेट घेतले.

हेही वाचा – IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर

प्रभात जयसूर्याला सामन्यात 9 विकेट्स घेतल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतले. त्याने १५ सामन्यात ८८ विकेट्स घेतल्या आहेत. रचिन रवींद्र पाचव्या दिवशी अवघी १ धाव जोडून बाद झाला. त्याचे शतक तर हुकलेच पण न्यूझीलंडच्या विजयाच्या आशाही संपल्या. २७ सप्टेंबरला श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – Chess Olympiad 2024: गुकेश-तानियाने चेस ऑलिम्पियाड ट्रॉफीसह रोहित शर्मा स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन, भारतीय बुद्धिबळ संघाचा VIDEO होतोय व्हायरल

WTC Points Table मध्ये श्रीलंकेची मोठी झेप

पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, श्रीलंकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेने आता न्यूझीलंडला मागे टाकले आहे. ८ सामन्यात ४ विजय आणि ४ पराभवानंतर श्रीलंकेचे ४८ गुण झाले असून ऑस्ट्रेलियानंतर संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीचा फिल्डिंग करतानाचा नागिन डान्स व्हायरल, बांगलादेशला त्यांच्याच स्टाईलमध्ये चिडवलं?

दुसरीकडे, न्यूझीलंडने गुणतालिकेत एक स्थान गमावले आहे. श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. किवी संघाचे ७ सामन्यात ३ विजय आणि ४ पराभवानंतर ३६ गुण आहेत. किवी संघ आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघ अजूनही पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेने WTC गुणतालिकेत घेतली मोठी झेप
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl beat nz by 63 runs in 1st test and sri lanka secure 3rd spot in wtc points table bdg