Sri Lanka vs Afghanistan, World Cup 2023: विश्वचषकाच्या ३०व्या अफगाणिस्तानने श्रीलंकेला सात गडी राखून धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. अफगाणी संघाच्या विजयाने श्रीलंकेच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. विश्वचषक २०२३मधील अफगाणिस्तान संघाचा हा तिसरा विजय आहे. याआधी त्यांनी इंग्लंड आणि पाकिस्तानला मात दिली होती. अफगाणिस्तानच्या अप्रतिम फिरकी गोलंदाजीने श्रीलंकेला अवघ्या २४१ धावांत रोखले आणि रहमत शाहने तुफानी अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यांच्या विजयाने गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २४१ धावा केल्या आणि अफगाणिस्तानने तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवामुळे श्रीलंकेचा पुढचा मार्ग कठीण झाला आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि पाकिस्ताननंतर अफगाणिस्ताननेही श्रीलंकेचा पराभव केला आहे.

अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला

अफगाणिस्तानने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला आहे. या विश्वचषकात अफगाणिस्तानचा हा तिसरा विजय आहे. यापूर्वी या संघाने इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभूत करून अस्वस्थता निर्माण केली होती. आता अफगाणिस्तान संघ सहा गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी श्रीलंकेसाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. फजलहक फारुकीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९.३ षटकांत २४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने ४५.२ षटकांत २४२ धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेसाठी कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी खेळली नाही, परंतु सर्वांच्या तुरळक योगदानामुळे संघाने २०० धावांचा टप्पा पार केला. पाथुम निसांकाने सर्वाधिक ४६ धावा केल्या. कुसल मेंडिसने ३९ आणि सदिरा समरविक्रमाने ३६ धावांचे योगदान दिले. शेवटी तिक्षणा २९ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने चार विकेट्स घेतल्या. मुजीब उर रहमानने दोन गडी बाद केले. अजमतुल्ला आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: World Cup 2023: “काही लोक म्हणत होते मी पुनरागमन…”सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

२४२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने पहिल्याच षटकात गुरबाजची विकेट गमावली. यानंतर इब्राहिम जादरानला (३९) रहमत शाहने (६२) साथीला घेत संघाला मोठा विजय मिळवून दिला. हे दोघेही बाद झाल्यानंतर अजमतुल्ला उमरझाई नाबाद ७३ आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदी नाबाद ५८ यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl vs afg afghanistan beat sri lanka by seven wickets rahmat shahs stormy half century avw