Sri Lanka vs Afghanistan, World Cup 2023: मंगळवारी, अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक २०२३ मधील तिसरा विजय नोंदवला. इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या संघांना पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानने आता श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह हा संघही उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदार बनला आहे. पण या सगळ्यात अफगाणिस्तानच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इरफान पठाण आणि हरभजन सिंग डान्स करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ २४१ धावांवर सर्वबाद झाला होता. ज्याचा पाठलाग अफगाणिस्तानने २८ चेंडू बाकी असताना केवळ तीन विकेट्स गमावून केला. सामना संपताच इरफान पठाण एका स्टुडिओमध्ये डान्स करताना दिसला. यात त्याला अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने साथ दिली. दोन्ही खेळाडूंच्या या डान्सचा व्हिडीओ इरफान पठाणने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे.

पाकिस्तानवर मिळवलेल्या अफगाणिस्तानचा विजय साजरा केला (इरफान पठाण डान्स)

इरफान पठाणने अफगाणिस्तानचा विजय अशा प्रकारे साजरा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अफगाणिस्तानच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतरही पठाणचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पठाण आणि अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान यांनी एकत्र नाचत विजय साजरा केला. वास्तविक, सामन्यातील विजयानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू मैदानात जल्लोष करत होते. त्यानंतर कॉमेंट्री करणारा इरफान पठाणही त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला.

गुणतालिकेमध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांची काय आहे स्थिती?

श्रीलंकेवरील विजयानंतर अफगाणिस्तान संघाने दोन स्थानांची झेप घेतली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेला मागे टाकून संघ सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची एका स्थानावर घसरण झाली आणि सहाव्या स्थानावर घसरण झाली. अफगाणिस्तानचे सहा सामन्यांत तीन विजय आणि तीन पराभवांसह सहा गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट -०.७१८ आहे. त्याचवेळी श्रीलंकेचे सहा सामन्यांनंतर दोन विजय आणि चार पराभवांसह चार गुण आहेत. त्याचा नेट रन रेट -०.२७५ आहे.

हेही वाचा: World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेटमध्ये अंतर्गत कलह! बिर्याणी मिळाली नाही म्हणून हॉटेलमध्ये जेवणास नकार? जाणून घ्या

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ सातत्याने आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. सोमवारी त्याने १९९६च्या चॅम्पियन श्रीलंका संघाचा सात विकेट्सनी पराभव केला. अफगाणिस्तानने या विजयासह गुणतालिकेत मोठा बदल केला आहे. हा संघ अजूनही अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्याचा दावेदार आहे. अफगाणिस्तानचे आणखी तीन सामने बाकी असून तीनही सामने जिंकण्यात संघ यशस्वी ठरला तर तो इतिहासही रचू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl vs afg irfan pathan danced again on afghanistans victory over sri lanka watch video avw