SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील गॅले येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश इंग्लिसने जबरदस्त शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ९० चेंडूत शतक झळकावले. त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावण्याचा मोठा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो २१वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. त्याने ९४ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि एक षटकार मारत १०२ धावांची खेळी साकारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोश इंग्लिसचे विक्रमी शतक –

जोश इंग्लिस पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीतही तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पदार्पणाच्या कसोटीत सर्वात जलद शतक झळकावण्याचा पराक्रम शिखर धवनच्या नावावर आहे, ज्याने ८५ चेंडूंत शतक झळकावले होते. त्याने ही कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच केली होती. तिसऱ्या क्रमांकावर ड्वेन स्मिथ आहे, ज्याने ९३ चेंडूत शतक झळकावले, तर चौथ्या क्रमांकावरी पृथ्वी शॉने पदार्पणाच्या कसोटीत ९९ चेंडूत शतक झळकावले आहे.

आई-वडिलांसमोर झळकावले पहिले कसोटी शतक –

इंग्लिश बऱ्याच दिवसांपासून कसोटीत संधीची वाट पाहत होते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही तो ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. त्याने क्षेत्ररक्षण केले पण त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता श्रीलंकेत संधी मिळताच त्याने शतक झळकावले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने हे शतक आपल्या आई-वडिलांसमोर झळकावले. आपल्या मुलाने एवढा मोठा पराक्रम केल्याचे पाहून दोघांनीही उभा राहून टाळ्या वाजवून त्याच्या शतकी खेळीचे कौतुक केले.

ऑस्ट्रेलियाने पार केला ६०० धावांचा टप्पा –

या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कांगारू संघाने भरघोस धावा केल्या. उस्मान ख्वाजाने ३५२ चेंडूत २३२ धावांची खेळी केली. कर्णधार स्मिथने १४१ तर इंग्लिशने १०२धावा केल्या. या तीन फलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावून ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.


मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl vs aus josh inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at galle vbm