Controversy on third umpire’s decision : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना सिल्हेट येथे पार पडला. ज्यात बांगलादेश संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१अशी बरोबरी साधली. मात्र, सामन्यादरम्यान श्रीलंके खेळाडू आणि सहाय्यक प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर चांगलेच संतापलेले दिसले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १६५ धावा केल्या, तर बांगलादेशने हे लक्ष्य केवळ १८.१ षटकांत पार केले. बांगलादेशच्या डावादरम्यान, सौम्य सरकारच्या विकेटवरून वाद झाला, ज्यामध्ये जेव्हा तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला, तेव्हा श्रीलंकेचे खेळाडू नाराजी व्यक्त करताना दिसले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?

मैदानी पंचांनी आऊट तर तिसऱ्या पंचांनी दिले नॉट आऊट –

सिल्हेटच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा संघ १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा डावाच्या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सौम्या सरकारविरुद्ध कॅच आऊटचे अपील करण्यात आली. यानंतर मैदानी पंचांनी अजिबात वेळ न घालवता आऊट दिले. त्यानंतर सौम्या सरकारने हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवण्यासाठी तत्काळ रिव्ह्यू घेतला. यानंतर जेव्हा तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला, तेव्हा त्यांच्या मते चेंडू आणि बॅटमध्ये अंतर होते, जेव्हा चेंडू बॅटजवळून गेला तेव्हा स्टंपच्या माईकवर आवाज आला, जो अल्ट्रा एजमध्येही दिसत होता.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : १०० वा कसोटी खेळणाऱ्या अश्विन-बेअरस्टो जोडीने रचला इतिहास, २०१३ नंतर प्रथमच ‘असे’ घडले

श्रीलंकेचे खेळाडू चांगलेच संतापले –

तथापि, असे असूनही, तिसऱ्या पंचांनी सौम्या सरकारला नॉट आऊट दिले आणि यामुळे श्रीलंकेचे खेळाडू चांगलेच संतापलेले दिसले. त्यांनी मैदानावरील पंचांशी बराच वेळ चर्चा केली. दरम्यान, ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित श्रीलंका संघाचे सहाय्यक प्रशिक्षकही चौथ्या पंचाकडे जाऊन निर्णयावर चर्चा करताना दिसले. सौम्या सरकारविरुद्ध जेव्हा ही अपील करण्यात आली, तेव्हा तो १० चेंडूत १४ धावा करून खेळत होता, मात्र नंतर तो २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : १००वी कसोटी खेळणारा अश्विन ठरला १४वा भारतीय, टीम इंडियाने दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’

नजमुलच्या खेळीने बांगलादेशचा एकतर्फी विजय –

या सामन्याबद्दल बोलायचे, तर बांगलादेश संघाकडून शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. ज्यामध्ये सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली, तर संघाने दुसरी विकेट ८३ धावांवर गमावली. येथून बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची नाबाद खेळी खेळून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याला तौहीद हृदयाचीही साथ लाभली. आता उभय संघांमधील या मालिकेतील निर्णायक सामना ९ मार्च रोजी होणार आहे.

Story img Loader