Asia Cup 2023 Bangladesh vs Sri Lanka ODI Match Updates: आशिया चषकातील दुसर्‍या सामन्यात श्रीलंकेने गुरुवारी (31 ऑगस्ट) बांगलादेशचा पराभव केला. गतविजेत्या श्रीलंकेने आपल्या आशिया चषकातील मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे. ब गटातील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला आहे. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ ४२.४ षटकांत सर्वबाद १६४ धावांवर आटोपला. नजमुल शांतोने ८९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेने ३९ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. सदीरा समरविक्रमाने ५४ आणि चरिथा अस्लंकाने नाबाद ६२ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशी संघाने ३६ धावांत तीन विकेट गमावल्या. त्याच्याकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक अधिक धावा केल्या. नजमुलने १२२ चेंडूत ८९ धावांची खेळी खेळली. त्याचे शतक हुकले. नजमुलशिवाय एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. तौहीद हृदयाने २०, मोहम्मद नईमने १६ आणि मुशफिकर रहीमने १३ धावा केल्या. या चौघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

हेही वाचा – Hotstar आणि Jio च्या स्पर्धेत प्रेक्षकांना झाला मोठा फायदा, Asia Cup पाठोपाठ विश्वचषकाचाही घेता येणार मोफत आनंद

तनजीद हसन शून्यावर, कर्णधार शकीब अल हसन (५), मेहदी हसन मिराज (५)धावांवर, मेहदी हसन (६) धावांवर बाद, तस्किन अहमद आणि मुस्तफिझूर शून्यावर बाद झाले. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने चार बळी घेतले. महिष तिक्षाने दोन गडी बाद केले. धनंज डी सिल्वा, दुनिथ वेलालगे आणि दासुन शानाका यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

सदीरा समरविक्रमा आणि चारिथ अस्लंका यांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी –

प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. संघाने ४३ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. पथुम निसांका १४ , दिमुथ करुणारत्ने १ आणि कुसल मेंडिस ५ धावांवर बाद झाला. यानंतर सदीरा समरविक्रमा आणि चारिथ अस्लंका यांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. सदिराने वनडे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने ७७ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली.

हेही वाचा – BAN vs SL: मथीशा पथिराना Asia Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला श्रीलंकेचा पहिलाच गोलंदाज

धनंजय डी सिल्वा दोन धावा करून बाद झाला. चारिथ असलंकाने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. अस्लंका ९२ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६२ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार दासुन शनाका १४ धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून कर्णधार शकिबने दोन बळी घेतले. तर तस्किन, शरीफुल आणि मेहदी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.