Bangladesh vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्याच षटकात श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेराची विकेट घेतली. बांगलादेशचा यष्टिरक्षक मुशफिकुर रहीमने शरीफुल इस्लामच्या गोलंदाजीवर आश्चर्यकारक झेल घेतला. वयाच्या ३६ व्या वर्षी मुशफिकुर रहीमने अप्रतिम चपळाई दाखवली. मुशफिकर रहीमच्या या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते कौतुक करत आहेत.

श्रीलंकेसाठी पुनरागमन करणारा कुसल परेरा ४ धावा काढून पहिल्याच षटकात बांगलादेशचा गोलंदाज शरीफुल इस्लामचा बळी ठरला. शरीफुल इस्लामच्या षटकातील शेवटचा चेंडू जो चौथ्या यष्टीवर आला, कुसल परेराला या चेंडू ड्रायव्ह मारायचा होता, पण चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि पहिल्या स्लिपमध्ये गेला. पण हा झेल टिपण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने डावीकडे हवेत डायव्हिंग करत हा झेल टिपला. हा चेंडू सहज पहिल्या स्लीप क्षेत्ररक्षकाकडे जात होता, मात्र ३६ वर्षीय मुशफिकर रहीमने हा झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. कुसल परेरा आणि धनंजय डी सिल्वा यांना संधी देण्यात आली आहे, तर करुणारत्ने आणि हेमंता यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. मुशफिकर रहीमच्या या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सोशल मीडिया चाहत्यांनी या झेलला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’ असेही म्हटले आहे.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदिरा समराविक्रामा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिष थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मधुशांका.

हेही वाचा – Roshan Ranasingha: भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित, अर्जुन रणतुंगा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, शकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, तनजीद हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम.