Kamindu Mendis Record in Test: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. गाले येथे खेळवल्या दजाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आज २६ सप्टेंबरपासूनच सुरूवात झाली आहे. या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा खेळाडू कामिंदू मेंडिसने एक विलक्षण कामगिरी आपल्या नावे केली आहे. कसोटी क्रिकेटच्या १३२ वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामिंदू मेंडिसने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच ५६ चेंडूत १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या आहेत. कामिंदू मेंडिसने त्याच्या कसोटीतील पदार्पणानंतर सलग आठ सामन्यांमध्ये विक्रमी आठ अर्धशतकं झळकावली आहेत, अशी कामगिरी करणारा कामिंदू मेंडिस हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs BAN 2nd Test: कानपूर कसोटीत पावसाचाच खेळ? खेळपट्टी कोणाला करणार मदत? वाचा हवामान आणि पिच रिपोर्ट

कामिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात किमान ५० धावा केल्या आहेत. पुन्हा एकदा, ५० हून अधिक धावांची इनिंग खेळून, कामिंदू असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरत इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव नोंदवले आहे. गेल्या वर्षी, पाकिस्तानचा सौद शकील हा त्याच्या पहिल्या सात सामन्यांपैकी प्रत्येकी ५० हून अधिक धावा करणारा कसोटी इतिहासातील पहिला खेळाडू ठरला, पण आता त्याचा हा विक्रम मोडित काढला आहे.

हेही वाचा – Shakib Al Hasan: शकिब अल हसनने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, म्हणाला, “…नाही तर भारताविरूद्धची टेस्ट अखेरचा सामना”

कसोटीत पदार्पण करताच विस्फोटक कामगिरी

कामिंदूने जुलै २०२२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने १०२ आणि १६४ धावांची खेळी खेळली. मार्च २०२४ मध्ये जेव्हा तो तिसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरले तेव्हा त्याने नाबाद ९२ धावा केल्या. तर मेंडिसने चौथ्या सामन्यात ११३ धावा केल्या. यानंतरही त्याची बॅट थांबली नाही आणि आता कामिंदूच्या नावावर एक विक्रम झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl vs nz kamindu mendis creates record of most successive fifty plus scores since test debut for sri lanka bdg