SL vs NZ Sri Lanka win their sixth consecutive ODI series at home : पल्लेकेले येथील पीएलए स्टेडियमवर पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा तीन गडी राखून पराभव करून ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. कमी धावसंख्येच्या सामन्यात, कुसल मेंडिसने बॅटने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारे श्रीलंका संघाचा विजयरथ सनथ जयसूर्याच्या कोचिंगखाली काही महिन्यांपासून सुसाट धावताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेने मायदेशात सलग सहावी वनडे मालिका जिंकली –

श्रीलंकेने मायदेशात सलग सहावी द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली आहे.. जुलै २०२१ मध्ये भारताकडून पराभूत झाल्यापासून ते मायदेशात सलग १० मालिकेत अपराजित आहेत. या वर्षी, श्रीलंकेने पाच द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत, जे केवळ याआधी २०१४ मध्येच साध्य करता आले होते. त्याचबरोबर श्रीलंकेने नो नोव्हेंबर २०१२ पासून न्यूझीलंडविरुद्ध पहिलीच मालिका जिंकली आहे. सनथ जयसूर्याच्या प्रशिक्षणाखाली संघ पूर्णपणे बदलला आहे आणि जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे.

सनथ जयसूर्याच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकेची कामगिरी –

  • भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली.
  • इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना इंग्लंडमध्ये जिंकला.
  • कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला.
  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिका जिंकली.
  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय.
  • न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका अनिर्णित.
  • न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली.

हेही वाचा – संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा परिणाम दिसून आला. त्यामुळे सामना ४७-४७ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि ४५.१ षटकांत २०९ धावांवर गारद झाला.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात

आता श्रीलंकेला ४७ षटकांत २१० धावांचे लक्ष्य गाठायचे होते, जे त्यांच्या संघाने ४६ षटकांत म्हणजे एक षटक आणि ३ गडी राखून २१० धावा केल्या आणि सामना सहज जिंकला. श्रीलंकेच्या विजयात कुशल मेंडिसची भूमिका महत्त्वाची होती. त्याच्या ७४ धावांच्या शानदार खेळीमुळे श्रीलंकेने सामना जिंकला. एका टोकाकडून तो एकटाच धावा काढत होता. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl vs nz sri lanka have created history by defeating new zealand to win their sixth consecutive odi series vbm