SL vs PAK, Asia Cup 2023: रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या बड्या फलंदाजांना पायचीत केल्यानंतर आता पुढच्याच सामन्यात दुनिथ वेल्लालागेने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही बाद केले. २० वर्षीय लेफ्ट आर्म स्पिनरच्या जाळ्यात आता जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेल्या फलंदाजाच्या नावाचाही समावेश झाला आहे. फायनलसाठी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधाराला पायचीत करत चांगलेच मामू बनवले. ३५ चेंडूत २९ धावा करत बाबर आझम जादुई चेंडूवर दुनिथ वेल्लालागेच्या शिकार झाला.
भारताच्या स्टार फलंदाजांना संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या २० वर्षीय फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने आज पाकिस्तानचीही दांडी गुल केली. पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील ‘करो वा मरो’ सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फखर जमान पुन्हा अपयशी ठरला. त्यानंतर बाबर आझम आणि शफीक यांनी ६४ धावांची अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, त्यांचा प्लॅन वेल्लालागेने हाणून पाडला. दुनिथ वेल्लालागेचा चेंडू बाबर आझमला कळलाच नाही. त्याने त्याचा पाय सरळ चेंडू येईल अशा अंदाजाने शॉट खेळण्यासाठी पुढे नेला पण तो ऑफस्पिन होऊन बाहेर गेला. बाबरला या चेंडूने चकवले आणि त्याचा पाय क्रीजपासून दूर गेला. त्याचा पाय क्रीजमध्ये परत येईपर्यंत यष्टिरक्षक कुसल मेंडीसने चपळाई दाखवत बेल्स उडवल्या.
पाकिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी ठेवले २५२ धावांचे आव्हान
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ४२ षटकांत ७ गडी गमावून २५२ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद ८६ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ५२ धावांची खेळी केली. इफ्तिखारने ४७ धावांचे योगदान दिले. त्याने रिझवानसोबत शतकी भागीदारी करत सामन्यात पाकिस्तानचे दमदार पुनरागमन केले. श्रीलंकेकडून पाथिरानाने तीन आणि मदुशनने दोन गडी बाद केले. तिक्षणा आणि वेल्लालागे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर या दोघांमधील सामना होणार आहे. पावसामुळे नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाही. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. तिथे १७ सप्टेंबरला भारताचा सामना होईल. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४२ षटकात २५२ धावा केल्या. भारताविरुद्ध फायनलमध्ये जर श्रीलंकेला खेळायचे असेल तर त्यांना या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करावा लागेल.
तरुण वयात दुनिथ वेल्लालागे मोठ्या फलंदाजांना केले बाद
विराट कोहली
रोहित शर्मा
बाबर आझम
के.एल. राहुल
शुबमन गिल
हार्दिक पांड्या