पत्रकामधील छोटय़ाशा चुकीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची शुक्रवारची कार्यकारिणी समितीची बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढवली, अशी कबुली सचिव संजय पटेल यांनी दिली.
‘‘प्रत्येक सदस्याला कार्यकारिणी समितीची बैठक का बोलावण्यात आली, याची कल्पना होती. परंतु या बैठकीची नोटीस जारी करताना झालेल्या छोटय़ाशा चुकीमुळे ती रद्द करण्यात आली. या बैठकीच्या पत्रकामध्ये ‘तातडीची’ हा शब्द नमूद करण्यात आला नव्हता,’’ असे पटेल यांनी सांगितले.
‘‘सर्वसामान्यपणे कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या आयोजनासाठी त्याची सूचना आधी जारी करावी लागते. दुर्दैवाने ही बैठक फक्त चार दिवसांआधी जाहीर केली होती. बैठकीसंदर्भातील तांत्रिक पेचप्रसंग टाळण्यासाठी आम्ही ती रद्द करण्याचा निर्णय घेतला,’’ असे ते पुढे म्हणाले.
श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याची कबुली यावेळी संजय पटेल यांनी दिली. ते म्हणाले की, ‘‘कोलकातामध्ये झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीतच श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत, हे सर्वप्रथम मी स्पष्ट करतो. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे निकालपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत त्यांना पायउतार व्हावे लागेल. त्यामुळे एन. श्रीनिवासन यांनी दालमिया यांना पुन्हा पदभार स्वीकारण्याची विनंती केली. या परिस्थितीमध्ये दालमिया यांनी आनंदाने आपली जबाबदारी स्वीकारली
आहे.’’
छोटय़ाशा चुकीमुळे कार्यकारिणीची बैठक रद्द करावी लागली -पटेल
पत्रकामधील छोटय़ाशा चुकीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची शुक्रवारची कार्यकारिणी समितीची बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढवली, अशी कबुली सचिव संजय पटेल यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-08-2013 at 08:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small mistake makes cancel meeting patel