SMAT 2024 Updates Mumbai vs Services Match : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत मुंबईच्या सर्व्हिसेसविरुद्धच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हैदराबादमध्ये मुंबई आणि सर्व्हिसेस आमनेसामने आले होते, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने दमदार फटकेबाजी केली. मात्र, आयपीएल २०२५ च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकुरने चार विकेट्स घेतल्या. परंतु पृथ्वी शॉने पुन्हा निराश केली.

पृथ्वी, श्रेयस आणि रहाणे पुन्हा अपयशी –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने लवकरच खाते न उघडता बाद झालेल्या पृथ्वी शॉच्या रुपाने पहिली विकेट गमावली. त्याचवेळी कर्णधार श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनाही छाप पाडता आली नाही आणि दोघांनीही अनुक्रमे २० आणि २२ धावा केल्या. यानंतर टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे भाग राहिलेले सूर्यकुमार आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली, ज्यामुळे मुंबईला चार बाद १९१ धावा करण्यात यश आले. प्रत्युत्तरा दाखल सर्व्हिसेस संघ १९.३ षटकांत १५३ धावांवर गारद झाला.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

सूर्या, शिवम शार्दुल चमकले –

सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने मुंबईच्या डावाची धुरा सांभाळली आणि सातत्याने मोठे फटके मारत संघाला संकटातून सोडवले. सूर्यकुमारने ४६ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या, तर शिवमने ३६ चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावा केल्या. विशेष म्हणजे आयपीएल २०२५च्या मेगा लिलावापूर्वा सूर्यकुमारला मुंबई इंडियन्सने १६.३५ कोटी रुपयांत कायम ठेवले होते, तर चेन्नई सुपर किंग्जने शिवम दुबेला १२ कोटी रुपयांत संघात कायम ठेवले होते.

हेही वाचा – MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह ऋषिकेशमध्ये पहाडी गाण्यासह ‘गुलाबी शरारा’वर धरला ठेका, पाहा VIDEO

सूर्यकुमार यादव बहिणीच्याल लग्नानंतर दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात परतला. सूर्यकुमार स्पर्धेतील उर्वरित सामने खेळणार असून २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी वनडे स्पर्धेतही तो सहभागी होणार असल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमारने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळली आणि भारताने चार सामन्यांची मालिका ३-१ अशा४ फरकाने जिंकली. त्या दौऱ्यात शिवम दुबे भारतीय संघाचा भाग नव्हता.

हेही वाचा – SMAT 2024 : गुजरातच्या खेळाडूने इंदूरमध्ये पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, अवघ्या ३६ चेंडूंत उत्तराखंडविरुद्ध झळकावले शतक

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ई गटात समाविष्ट असलेल्या मुंबईने तीनपैकी दोन सामने जिंकले आहे. मुंबईचे असून दोन सामने बाकी आहेत. भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत, ज्यात हार्दिक पंड्या, श्रेयस, तिलक वर्मा, रिंकू सिंग, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सूर्यकुमार रणजी ट्रॉफीमध्येही खेळला होता.

Story img Loader