Smriti Mandhana 2nd Consecutive Century in INDW vs SAW ODI: दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सध्या भारतीय दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला. तर आता दुसरा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातही भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाची बॅट चांगलीच तळपली आहे. तिने दोन्ही वनडे सामन्यात सलग दोन शतके झळकावली आहेत. यासह तिने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही मानधनाने शतक झळकावले. मानधनाने १०३ चेंडूत शतक झळकावले असून हे तिचे एकदिवसीय कारकिर्दीतील ७वे शतक आहे. मागील सामन्यातही मानधनाने शानदार शतक झळकावले होते. तिने १२७ चेंडूत ११७ धावांची शानदार खेळी केली होती आणि टीम इंडियाने तो सामना १४३ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. आता पुन्हा एकदा मानधनाने शतक झळकावले. या शतकासह तिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. सलग दोन एकदिवसीय शतके झळकावणारी मानधना ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
स्मृती मानधनाने शतकासह केली मिताली राजच्या रेकॉर्डची बरोबरी
स्मृती मानधनाने वनडेमध्ये ७ शतके झळकावली असून यासह तिने माजी भारतीय कर्णधार मिताली राजची बरोबरी केली आहे. वनडेमध्ये ७ शतके झळकावणारी मानधना ही पहिली भारतीय सलामीवीर आहे. मानधनाने केवळ ८४ डावांमध्ये ७ वनडे शतके केली आहेत. दुसरीकडे, मितालीला ७ शतके झळकावण्यासाठी २११ डाव लागले. हरमनप्रीत कौर ५ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – “माझा भाऊ थोडा चांगला असता…” वासिम जाफर मायकल वॉनला उद्देशून पाहा काय बोलून गेला? VIDEO व्हायरल
2⃣nd successive ? of the Series
— BCCI Women (@BCCIWomen) June 19, 2024
7⃣th overall ? in ODIs
Smriti Mandhana continues to weave her magic ?
What a well-paced knock this is from the #TeamIndia vice-captain! ? ?
Follow The Match ▶️ https://t.co/j8UQuA5BhS #INDvSA | @mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ktCxfh6aK4
भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या महिला खेळाडू:
स्मृती मानधना- ७ शतके
मिताली राज- ७ शतके
हरमनप्रीत कौर- ५ शतके
पूनम राऊत- ३ शतके
हेही वाचा – T20 WC 2024: बांगलादेशच्या खेळाडूवर ICC ची कारवाई, नेपाळविरूद्धच्या सामन्यात कर्णधारासह घातलेला वाद
????. ?. ??????! ? ?
— BCCI Women (@BCCIWomen) June 19, 2024
WHAT. A. KNOCK! ? ?
Well played, @mandhana_smriti! ? ?
That's one fine innings… ?
… yet again! ?
Follow The Match ▶️ https://t.co/j8UQuA5BhS#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/F88F1nijjY
बंगळुरूच्या संथ खेळपट्टीवर टीम इंडियाची सुरुवात संथ झाली. टीम इंडियाला पहिल्या १० षटकांत केवळ २८ धावा करता आल्या. टीम इंडियाच्या ५० धावा १७ षटकांत पूर्ण झाल्या. मात्र त्यानंतर मानधना आणि हेमलता यांनी वेगवान फलंदाजी करत अवघ्या ५७ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. मानधनाने ६७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हेमलताची विकेट पडल्यानंतर मानधनाने कर्णधार हरमनप्रीतसह भारताचा डाव सावरला आणि या कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीने १५० धावांची भागीदारी रचली. स्मृतीसह कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार अर्धशतक झळकावले असून कौरही शतक झळकावण्याच्या जवळ आहे. स्मृती मानधनाने झेलबाद होण्यापूर्वी १२० चेंडूत २ षटकार आणि १८ चौकारांसह १३६ धावांची प्रभावी खेळी करत विक्रमही रचले.