Smriti Mandhana 10th ODI Century INDW vs IREW: स्मृती मानधनाने आयर्लंडविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आपल्या कारकिर्दीतील १० वे वनडे शतक झळकावले आहे. आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत मानधनाने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी खेळली आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराने आयर्लंडविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमधील तिचे १०वे शतक झळकावले, तर तिचे यंदाचे पहिले शतक आहे.
स्मृतीने ७० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांचा आकडा गाठला. यासह स्मृतीने सर्वात जलद वनडे शतक झळकावणारी पहिला महिला फलंदाज ठरली आहे. मानधनाने अवघ्या ७० चेंडूत शतक झळकावले. हे शतक मानधनासाठी खास आहे कारण हे तिचे वनडे क्रिकेटमधील १० वे शतक आहे. ही कामगिरी करणारी ती जगातील चौथी आणि भारतातील पहिली खेळाडू आहे.
हेही वाचा – IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
स्मृती मानधानाचे विक्रमी शतक
स्मृती मंधानाने आयर्लंडविरुद्ध सुरूवातीपासूनच वादळी फलंदाजी केली. तिने पॉवरप्लेमध्ये प्रतिका रावलसह ९० धावा जोडल्या. या दोन्ही खेळाडूंनी अवघ्या ७७ चेंडूत शतकी भागीदारी केली. मानधनाने ३९ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर स्मृतीने फटकेबाजीचा वेग वाढवला आणि पुढच्या ३१ चेंडूत शतक झळकावले. मानधनाने आपल्या शतकात ४ षटकार आणि ९ चौकार लगावले. तिचा स्ट्राइक रेट १४० पेक्षा जास्त होता. मानधना सध्या तुफान फॉर्मात आहे. तिने गेल्या १० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २ शतकं आणि ६ अर्धशतकं झळकावली आहेत. ती केवळ एका डावात एकेरी धावसंख्येवर बाद झाली आहे.
शतकानंतर स्मृतीने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली आणि आयरिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण शेवटी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्मृती बाद झाली. स्मृतीने अवघ्या ८० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह १३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर प्रतिका रावल आणि स्मृती मानधनाच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी २३३ धावांची विक्रमी भागीदारी रचली.
सर्वात जलद वनडे शतक झळाकवणाऱ्या भारतीय महिला फलंदाज
७० चेंडू – स्मृती मानधना वि आयर्लंड – २०२५
८७ चेंडू – हरमनप्रीत कौर वि दक्षिण आफ्रिका – २०२४
९० चेंडू – हरमनप्रीत कौर वि ऑस्ट्रेलिया – २०१७
९० चेंडू – जेमिमा रॉड्रीग्ज वि आयर्लंड – २०२५
९८ चेंडू – हरलीन देओल वि वेस्ट इंडिज – २०२४
स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या शतकासह आणखी एक विश्वविक्रम केला. वनडेमध्ये १० शतकं झळकावणारी मानधना ही जगातील पहिली डावखुरी महिला फलंदाज आहे. मानधनाच्या आधी, मेग लॅनिंग, सुझी बेट्स आणि टॅमी ब्युमॉन्ट यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये १० पेक्षा जास्त शतकं झळकावली आहेत आणि ते सर्व उजव्या हाताचे फलंदाज आहेत.