Smriti Mandhana First Batsman To Score 500 Runs In The Hundred: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना सध्या इंग्लंडमधील हंड्रेड स्पर्धेत सहभागी झाली आहे. स्मृती मंधानाने या स्पर्धेत आणखी एक धडाकेबाज अर्धशतक झळकावले. या स्पर्धेत सदर्न ब्रेव्हकडून खेळणाऱ्या मंधानाने सामन्यादरम्यान अर्धशतक झळकावून स्पर्धेत नवा इतिहास रचला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मृती मंधानाने आपल्या खेळीदरम्यान ४२ चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांची शानदार खेळी केली. तिच्या या उत्कृष्ट खेळीनंतरही सदर्न ब्रेव्हजला चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असे असतानाही स्मृती मंधानाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

द हंड्रेड महिला क्रिकेट स्पर्धेत स्मृतीचं हे पाचवं अर्धशतक आहे. यासह ती आता या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारी खेळाडू बनली आहे. मंधानाने या बाबतीत जेमिमाह रॉड्रिग्जचा विक्रम मोडला आहे. द हंड्रेड महिला क्रिकेट स्पर्धेत मंधानापूर्वी रॉड्रिग्सच्या नावावर सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम होता, मात्र आता मंधाना तिच्या पुढे गेली आहे.

स्पर्धेत ५०० धावा करणारी पहिली खेळाडू –

या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्मृती मंधाना द हंड्रेड महिला स्पर्धेत ५०० धावा करणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. याबाबतीत नॅट सेव्हियर ब्रंट दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिने द हंड्रेडमध्ये आतापर्यंत ४९७ धावा केल्या आहेत. स्मृती मंधानाने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अर्धशतकही झळकावले. तिने चालू हंगामातील दोन सामन्यांमध्ये १६०.२५ च्या स्ट्राइक रेटने १२५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Cricket Rules: क्रिकेटमध्ये एक फलंदाज १० प्रकारे होवू शकतो आऊट, तुम्हाला माहित आहेत का सर्व नियम? नसेल तर जाणून घ्या

सामन्याबद्दल बोलायचे, तर वेल्स फायरने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १६५ धावा केल्या. संघाकडून हिली मॅथ्यूजने ६५ धावा केल्या. याशिवाय टॅमी ब्युमाउंटने २६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सदर्न ब्रेव्हज संघाचा चार धावांनी पराभव झाला. डॅनी व्याटने ६७ धावांचे योगदान दिले, तर मंधानानेही ७० धावा केल्या. ती नाबाद परतली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti mandhana created history by breaking jemimah rodriguezs record in hundred tournament vbm