भारतीय महिला संघातली मराठमोळी फलंदाज स्मृती मंधानाने आपला फलंदाजीतला सर्वोत्तम फॉर्म कायम राखला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या वन-डे सामन्यात स्मृतीने कर्णधार मिताली राजसोबत भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसऱ्या सामन्यात नाबाद 90 धावांची खेळी करुन स्मृतीने सामनावीराचा किताबही पटकावला. या खेळीदरम्यान स्मृती मंधानाने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. (निकष 1 ऑगस्ट 2017 पासूनचा काळ)

दुसऱ्या सामन्यानंतर स्मृती मंधानाच्या खात्यात 78.54 च्या सरासरीने 864 धावा जमा आहेत. स्मृतीने न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिन, दक्षिण आफ्रिकेच्या लिझल ली, इंग्लंडच्या टॅमी बेमाऊंट, न्यूझीलंडच्या सुएझ बेट्स अशा प्रमुख खेळाडूंना मागे टाकून अव्वल स्थान कायम राखलं आहे. तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिलांनी न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकली आहे. 1995 साली भारतीय महिलांनी न्यूझीलंडविरुद्ध शेवटची वन-डे मालिका जिंकली होती. दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी 8 विकेट राखून न्यूझीलंडवर मात केली.

Story img Loader