Smriti Mandhana ODI Century Record: भारतीय महिला संघ वि न्यूझीलंड महिला संघामध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ च्या फरकाने विजय मिळवला. टी-२० विश्वचषक २०२४ मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताच्या केलेल्या पराभवाचा टीम इंडियाने या मालिकेतून बदला घेतला आहे. स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक या सामन्याचा महत्त्वाचा भाग ठरला. स्मृती मानधनाच्या शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर तिसऱ्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. या शतकासह स्मृती मानधनाने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. किवी संघ ४९.५ षटकांत २३२ धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ तर प्रिया मिश्राने २ विकेट घेतले. न्यूझीलंड संघाने दिलेल्या २३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात फार चांगली झाली नाही. सलामीवीर शफाली वर्मा १६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर सलामीवीर स्मृती मानधना हिने यस्तिका भाटियाबरोबर चांगली भागीदारी करत संघाची धावसंख्या १०० च्या जवळ नेली.

हेही वाचा – IND vs NZ: मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल, या वेगवान गोलंदाजाची भारतीय संघात होणार एन्ट्री, पदार्पणाची मिळणार संधी

यस्तिका भाटिया बाद झाल्यानंतर मानधानाला कर्णधार हरमनप्रीत कौरची चांगली साथ लाभली. यादरम्यान मानधनाला वनडेमध्ये शतक झळकावले. हे तिचे वनडे कारकिर्दीतील ८वे शतक होते. स्मृतीने १२२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. अशाप्रकारे महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिने मिताली राजचा ७ वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढला.

हेही वाचा – IPL 2025 Auction: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर ते केएल राहुल… ‘या’ ५ मोठ्या खेळाडूंना संघ करू शकतात रिलीज, काय आहे कारण?

महिला वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके

८ – स्मृती मानधना (८८ डाव)
७ – मिताली राज (२११ डाव)
६ – हरमनप्रीत कौर (१६ डाव)

महिला क्रिकेटमधील सर्वात कमी डावातील ८वे एकदिवसीय शतक

४५ – मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
७४ – टॅमी ब्यूमॉन्ट (इंग्लंड)
८८ – स्मृती मानधना (भारत)
८९ – नताली सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)

हेही वाचा – Olympic 2028: भारतामुळे Olympic 2028 मधील क्रिकेट सामने लॉस एंजेलिसमध्ये होणार नाहीत? वाचा कारण

स्मृती मानधना १०० धावा करून बाद झाली. मानधना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमिमासह ४४.२ षटकांत २३३ धावांचे लक्ष्य गाठले. यासह भारतीय संघाने वनडे मालिका २-१ अशी खिशात घातली. भारताने पहिला एकदिवसीय सामना 59 धावांनी जिंकला तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti mandhana hits 8th odi century broke mithali raj record to become the indian player with most odi centuries indw vs nzw bdg